शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्याय कुठे मागायचा, यासाठी ११ वर्षे फरफट

By admin | Updated: February 21, 2016 01:24 IST

खासगी कंपनीने नोकरीतून बडतर्फ केल्यानंतर त्याविरुद्ध न्याय कुठे मागायचा, याचा फैसला करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागल्याने, औरंगाबाद येथील एका कामगाराची

मुंबई: खासगी कंपनीने नोकरीतून बडतर्फ केल्यानंतर त्याविरुद्ध न्याय कुठे मागायचा, याचा फैसला करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागल्याने, औरंगाबाद येथील एका कामगाराची तब्बल ११ वर्षे फरफट झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या कामगाराच्या बाजूने निकाल देत, बडतर्फीविरुद्ध त्याने दाखल केलेले प्रकरण औरंगाबाद येथील श्रम न्यायालयात चालविण्याचा आदेश दिला.वडवाल नगर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद येथे राहणारे नंदराम आबाजी मांडगे यांनी त्यांच्या बडतर्फीविरुद्ध दाखल केलेले प्रकरण, औरंगाबादच्या श्रम न्यायालयाने येत्या सहा महिन्यांत निकाली काढावे, तसेच त्याच्या सुनावणीसाठी मांडगे व कंपनी या दोघांनीही येत्या ८ मार्च रोजी औरंगाबाद न्यायालयापुढे हजर राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने दिला.नंदराम मांडगे मे. गरवारे पॉलिस्टर कंपनीत नोकरीला होते. कंपनीच्या वाळुंज (औरंगाबाद) येथील कारखान्यात त्यांनी बॉयलर अ‍ॅटेन्डन्ट व नंतर कनिष्ठ आणि वरिष्ठ सुपरवायझर म्हणून काम केले. त्यानंतर कंपनीने त्यांची बदली आधी सिल्वासा कारखान्यात व नंतर पाँडिचेरी येथे केली. मार्च २००५ मध्ये कंपनीने पाँडिचेरी येथील कारखाना बंद केला व तेच कारण देत, मांडगे यांना कामावरून कमी केले.या बडतर्फीविरुद्ध मांडगे यांनी औरंगाबाद येथील श्रम न्यायालयात अनुचित कामगार प्रथा कायद्यान्वये फिर्याद दाखल केली. बडतर्फी पाँडिचेरी येथे झालेली असल्याने फक्त तेथेच अशी फिर्याद दाखल केली जाऊ शकते, असा कंपनीने आक्षेप घेतला. श्रम न्यायालयाने तो अमान्य केला. पुढे औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालयानेही कंपनीचे म्हणणे मान्य केल्याने, मांडगे यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. शेवटी श्रम न्यायालयाने दिलेला निकालच सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. कंपनीचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे व पाँडिचेरीचा कारखाना बंद करण्याचा निर्णयही तेथेच झाला. त्यामुळे पाँडिचेरी व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणच्या श्रम न्यायालयांत दाद मागितली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. (विशेष प्रतिनिधी)अजून दुसरी इनिंग्ज बाकीखेदाची गोष्ट अशी की, मांडगे यांच्या फिर्यादीवर सुनावणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा निकाल औरंगाबादच्या श्रम न्यायालयाने सुरुवातीलाच दिला होता. तोच निकाल आता सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, पण हे होईपर्यंत ११ वर्षे निघून गेली आहेत व दरम्यान मांडगे यांनी सेवानिवृत्तीचे वयही पार केले आहे. औरंगाबादच्या श्रम न्यायालयात आता जो काही निकाल होईल, त्याविरुद्ध कंपनी किंवा मांडगे पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू शकतात हे लक्षात घेतले, तर मुळात मांडगे यांची बडतर्फी कायदेशीर होती की बेकायदा, याचा अंतिम फैसला व्हायला आणखी किमान १०-१५ वर्षेही लागू शकतात.