शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे कामकाज सातव्या दिवशीही ठप्प

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निवेदन देऊनही आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कर्जमाफीच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ झाला

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निवेदन देऊनही आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कर्जमाफीच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ झाला. या मुद्यावरून सलग सातव्या दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आणि कोंडी कायम राहिली. विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे...अशी घोषणाबाजी दोन्ही बाकांवरील सदस्यांनी सुरू केली. हा गदारोळ एवढा वाढला की कामकाज दोन वेळा प्रत्येकी अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल गदारोळातच मांडला. त्यानंतर गदारोळामुळे कामकाज पुन्हा एकेक तासासाठी दोनवेळा तहकूब करण्यात आले. तरीही गोंधळाची मालिका कायम राहिल्याने तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. दुष्काळ न पडण्याची सरकार हमी देणार का?कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची हमी विरोधक देणार का, या मुख्यमंत्र्यांच्या सवालाला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले. विधानपरिषदेत कामकाज सुरू होताच मुंडे यांनी कर्जमाफीबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ५० टक्के जादा भाव देण्याची,बोगस बी बियाणे रोखण्याची तसेच दुष्काळ पडणार नसल्याची हमी सरकार देत असेल तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधक देतील, असा टोला मुंडे यांनी हाणला. कर्जमाफीसाठी वेंसद्र सरकारची मदत घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. उत्तर प्रदेशातच कर्जमाफी दिली जाईल, असे केंद्रीय कृषी मंत्री राज्यसभेत सांगतात आणि इकडे आमचे मुख्यमंत्री केंद्राकडून कर्जमाफीसाठी मदत आणू म्हणतात मग नेमके खरे काय, असा सवाल मुंडे यांनी केला. सलग सातव्या दिवशी आम्ही शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत असताना मुख्यमंत्री सभागृहात येण्याचीही तसदी घेत नाहीत हा सभागृहाचा अवमान असल्याची टीका त्यांनी केली. कर्जमाफीची घोषणा होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही. असे सांगत विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळातच वित्तमंत्री राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी, कर्जमाफी होत नाही तोपर्यत कामकाज चालू न देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी अहवाल मांडता येणार नाही, असा सांगितले. गदारोळातच आर्थिक पाहणी अहवालासह लोकलेखा समितीचा अहवाल मांडण्यात आला. सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) गदारोळातच मांडला आर्थिक सर्वेक्षण अहवालकर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत विरोधकांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. मात्र, शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करणे आवश्यक होते. त्यामुळे या गदारोळातच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अहवाल मांडण्याची सूचना केली. त्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. अरुंधती भट्टाचार्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगस्टेट बँक आॅफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्या विरोधात काँग्रेस सदस्य शरद रणपिसे आणि सुनिल दत्त यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. शेतक-यांना कर्जमाफी देऊ नये. त्यामुळे वित्तीय शिस्त बिघडते. एकदा कर्जमाफी दिल्यास शेतकरी पुन्हा कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहतात असे विधान भट्टाचार्य यांनी केले होते.