शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

एसटीत होणार जम्बो भरती, १५ हजार रिक्त जागा

By admin | Updated: September 19, 2016 22:36 IST

एसटी महामंडळात येत्या काही महिन्यात जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळात रिक्त जागाच भरल्या न गेल्याने तब्बल १५ हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १९  - एसटी महामंडळात येत्या काही महिन्यात जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळात रिक्त जागाच भरल्या न गेल्याने तब्बल १५ हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यात चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशीही बोलणी सुरु केली आहे. २0१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर महामंडळात भरती प्रक्रीया झाली नाही. दोन वर्षात एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २६ हजार ११५ जागा मंजुर असून यात १ लाख ४ हजार ३९८ मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण २२ हजार २४ हजार जागा रिक्त असून यामध्ये ६ हजार ९0२ ही बढतीतील पदे तर १५ हजार १२२ सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणाऱ्या पदांचा समावेश आहे. यात बढती प्रक्रीयेतील पदे भरण्याचे काम एसटी महामंडळाकडून सुरु आहे. सरळ सेवेत असणाऱ्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या ३६ हजार ७३२ चालक असून आणखी २ हजार ९७७ चालकांची गरज आहे. तर ३४ हजार ८0७ वाहक कार्यरत असून आणखी ३ हजार ९६३ वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही ५ हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-४ मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही सर्व पदे लवकरच भरली जाणार असून त्यासाठी भरती प्रक्रीया राबवणाऱ्या एका कंपनीला त्याचे काम दिले जाईल. यासाठी निविदा प्रक्रीयाही सुरु असल्याची माहिती देण्यात आली. कंपनीची नेमणूक होताच भरती प्रक्रीयेसाठीही जाहिरात काढली जाणार आहे. .............................................महत्वाची रिक्त पदेपदे मंजुर कार्यरत रिक्तचालक ३८,८२५ ३६,७३२ २,९७७वाहक ३७,९१0 ३४,८0७ ३,९६३कारागिर ७,६९९ ४,४६२ ३,२0२सहा.कारागिर ६,९८५ ४,७३४ २,२१३..................................अधिकारी वर्ग १ आणि २ चीही ९३३ पदे मंजुर आहेत. यात प्रत्यक्षात ५५२ पदे भरलेली असून ३८१ रिक्त जागा आहेत. ..............................एवढी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त जागा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. ..........................रिक्त जागांसाठी भरती प्रक्रीया टप्प्याटप्यात करायची की एकदम सर्व जागा भरायचा याबाबतचा निर्णय सर्वोतोपरी एसटी महामंडळाकडून घेतला जाणार आहे. त्याआधी भरती प्रकीया राबवणाऱ्या कंपनीचीही नियुक्ती केली जाईल. .................................