शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: July 5, 2015 18:30 IST

मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ५ - मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करणा-या ५७ समर्थकांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कदम यांच्या समर्थकांनी शनिवारी मोहोळ पोलिस स्थानकावर हल्ला केला होता. 
सोलापूर- पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर मोहोळ येथील पुलाखालील मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठीी संरक्षक जाळी बसवण्यात आली होती. मात्र आ. कदम यांच्या सांगण्यावरून ही जाळी परस्पर काढण्यात आल्याने मोहोळ पोलिसांनी कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्यावरील गुन्ह्यांप्रकरणी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी कदम निघाले, मात्र जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर कदम यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र समर्थक बधले नाहीत. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे अधिक खवळलेल्या समर्खांनी पोलिस स्टेशनवरच दगडफेक केली. त्यात ४ अधिका-यांसह एकूण १८ पोलिस जखमी झाले. 
सरकारी कामात अडथळा आणल्याचा व पोलिस कर्मचा-यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला. त्यांना आज मोहोळ न्यायालयापुढे हजर केले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली असून त्यांना कळंबा तुरूंगात ठेवण्यात येणार आहे.