शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा लढत अटळ

By admin | Updated: May 8, 2017 04:12 IST

कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. विधानसभेतील शब्द हा वचनाप्रमाणे असतो. एक महिना झाला; परंतु अजून काहीही झालेले नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर लढत निश्चित आहे, असा अल्टीमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तयार केलेला ग्राऊंड रिपोर्ट पक्षप्रमुख ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत हा दौरा नाही. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू होण्यात आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार आहे. पहिले कर्ज तसेच राहणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात मागेल त्याला कर्ज देऊ. परंतु पहिल्या कर्जातून त्यांना मुक्त करणे गरजेचे आहे. जिल्हा बँका मोडीत काढल्या आहेत. राष्ट्रीय बँका गावागावांत गेल्या असल्या तरी त्यांचे शेतकऱ्यांशी नाते नसल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतून बाहेर पडणार नाहीहे अभियान निवडणुकीचा स्टंट नाही. माझ्या मार्गाने कर्जमुक्तीसाठी पुढे जाणार आहे. तीन वर्षांपासून वाटच पाहत आहोत. यापुढे मला जे वाटते ते करणार, माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. मी सत्तेला चिकटून राहिलेलो नाही. बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अपेक्षा असणे चूक नाही. पूर्वीच्या सरकारसारखे अनुभव जनतेला येऊ नयेत. सत्तेत असताना विरोध करून जनतेसोबत राहण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.तूर खरेदीबाबत नियोजन चुकलेशेती उत्पादनाचे नियोजन करणाऱ्यांमध्ये शेतकरीच नाहीत. तूर खरेदीमध्ये शासनाचे नियोजन चुकले आहे. शेतकरी तूर ठेवणार कुठे, असा प्रश्न असून खरेदीच्या अटी, शर्ती कमी करून तूर खरेदी केली जावी. राष्ट्रपतिपदासाठी भागवतच योग्य देशाला हिंदुत्वादी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. देशात आरआरएसचे कार्यकर्ते अनेक राज्यांत राज्यपाल झालेले आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात, असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा.राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता.