शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला नोकरदारांच्या तक्रारींना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 02:53 IST

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ व लिंगभेदाच्या प्रतिबंधासाठी सरकारी नोकरदार महिलांना न्याय मिळण्याचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले आहेत. त्यासाठी गृहविभागाच्या अखत्यारित स्वतंत्र तक्रार निवारण समितीच्या स्थापनेला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.

ठळक मुद्देअखेर ‘मुहूर्त’ मिळाला गृहविभागाचा तक्रार निवारण समितीला हिरवा कंदील

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ व लिंगभेदाच्या प्रतिबंधासाठी सरकारी नोकरदार महिलांना न्याय मिळण्याचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले आहेत. त्यासाठी गृहविभागाच्या अखत्यारित स्वतंत्र तक्रार निवारण समितीच्या स्थापनेला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.अवर सचिव एस. एस. कवळे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापण्यात आली आहे. सरकारी  कार्यालयांमधील सहकारी पुरुष अधिकारी व कर्मचार्‍यांच्या गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींचा निपटारा आता त्यांच्याकडून केला जाईल. पूर्वीच्या समिती सदस्यांची अन्य विभागात बदली झाल्याने समितीचे अस्तित्व संपुष्टात आले होते, असे विभागातील सूत्रांनी सांगितले.महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीनेच नव्हे, तर त्यांच्याहून दोन पावले पुढे असल्याचे चित्र सध्या समाजात पाहायला मिळते. तथापि, समाजातील पुरुषसत्ताक पद्धतीचा पगडादेखील बर्‍याच प्रमाणात कायम आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. या प्रकारांना, घटनांना अटकाव करण्याबरोबरच, कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळाबाबत दाद मागण्यासाठी, केंद्र सरकारने २0१३ साली कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम बनविला. त्यानुसार, प्रत्येक विभाग, कार्यालयात ही तक्रार निवारण समिती बनविणे अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार, २0१४ मध्ये गृहविभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, संबंधित सदस्याची अन्यत्र बदली झाली, तर काही जण नवृत्त झाल्याने ती आपसूक बरखास्त झाली होती. त्याबाबत ओरड होऊ लागल्याने, अखेर पुन्हा नव्याने तक्रार निवारण समितीचे गठण करण्यात आल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

समितीतील सदस्यअवर सचिव कवळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये डोंबिवलीतील परिवर्तन महिला संस्थेच्या पदाधिकारी ज्योती पाटकर यांचा समावेश आहे. अन्य चार सदस्या या गृहविभागातील असून, अवर सचिव, कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी यांचाही या समितीत समावेश आहे.

हे असेल समितीचे कार्यकामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणे, महिला कर्मचारी, अधिकार्‍यांकडून आलेल्या लिंगभेद व लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीची शहानिशा निर्धारित मुदतीत करून, त्याबाबत योग्य तो अहवाल कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करणे.

टॅग्स :Womenमहिला