शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दीड दशकानंतर मिळाला ४७७ पोलीस अधिकाऱ्यांना न्याय

By admin | Updated: August 2, 2015 03:33 IST

गेल्या दीड दशकापासून अन्याय सहन करीत असलेल्या राज्य पोलीस दलातील ४७७ अधिकाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या बॅचच्या पहिल्या तुकडीतील सहकाऱ्यांप्रमाणे त्यांनाही २००० सालाची सेवा

- जमीर काझी,  मुंबईगेल्या दीड दशकापासून अन्याय सहन करीत असलेल्या राज्य पोलीस दलातील ४७७ अधिकाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या बॅचच्या पहिल्या तुकडीतील सहकाऱ्यांप्रमाणे त्यांनाही २००० सालाची सेवा ज्येष्ठता मिळाली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) दिलेल्या बडग्यामुळे पोलीस महासंचालकांच्या वतीने शनिवारी त्याबाबतचे आदेश लागू करण्यात आले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १९९८ साली उपनिरीक्षकांच्या मर्यादित विभागीय परीक्षेतील ४७७ उत्तीर्ण उमेदवारांना तीन व सहा वर्षांनी दोन टप्प्यांत प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते आणि त्याच वर्षापासून त्यांची सेवा गृहीत धरण्यात आलेली होती. मात्र प्रशिक्षण उशिरा घेण्यामध्ये त्यांचा काहीही दोष नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘मॅट’ने पोलीस मुख्यालयावर ताशेरे ओढले होते. त्याबाबत ८ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याची सूचना केली होती.पोलीस दलात उपनिरीक्षक पदाची भरती एमपीएससीतर्फे सरळ सेवा, मर्यादित विभागीय आणि महासंचालकांकरवी सेवाज्येष्ठतेनुसार परीक्षा घेऊन केली जाते. त्यानुसार पदवीधर कॉन्स्टेबलची १९९८ साली एमपीएससीतर्फे विभागीय परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ६५७ उमेदवार उत्तीर्ण झाले. अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांना ९ महिन्यांचे नाशिक येथील पोलीस अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक असते. पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण व खास विभागाच्या वतीने त्याचे नियोजन केले जाते. मात्र त्यांच्याकडून सर्वांना एकाचवेळी प्रशिक्षणाला न पाठविता तीन टप्प्यांत मेरीटप्रमाणे निवड करून पाठविण्यात आले. पहिल्यांदा २२ मार्च २००० साली १८० जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर १३१ व ३४६ जणांना अनुक्रमे १६ एप्रिल २००१ व १ जून २००४ रोजी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. पहिल्या टप्प्यात ट्रेनिंगला गेलेल्यांना उपनिरीक्षक म्हणून त्याच वर्षाची सेवाज्येष्ठता मिळाली. मात्र उर्वरित दोन टप्प्यांतील अधिकाऱ्यांना ते प्रशिक्षणाला गेलेल्या वर्षाची म्हणजे अनुक्रमे २००१ व २००४ सालची सेवा ग्रहीत धरण्यात आली. वास्तविक सर्व अधिकारी एकाच वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना एकाच वर्षाची सेवाज्येष्ठता मिळणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका त्यांना बसून त्यापासून वंचित राहावे लागले होते.गेल्या १५ वर्षांपासून सेवाज्येष्ठतेबाबत अन्याय सहन करीत असलेले या ४७७ अधिकाऱ्यांपैकी बहुतांश जण विविध पोलीस घटकामध्ये सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आता लवकरच निरीक्षक म्हणून पदोन्नती, वेतनश्रेणी व अन्य लाभ फरकासह मिळणार आहेत. १९९८ साली पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी ज्ञानदेव केदार व अन्य ३९ जणांना अखेरच्या टप्प्यात म्हणजे २००४ साली प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यांनी पहिल्या टप्प्यात १८० जणांना ज्या वर्षाची सेवाज्येष्ठता दिलेली आहे, तेच वर्ष आपल्याला मिळण्यासाठी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. त्यांची बाजू रास्त असल्याचे सांगत त्याबाबत गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याचे आदेश मिळाल्यानंतर पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी उर्वरित दोन्ही वर्षांमध्ये पाठविण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या मेरीटप्रमाणे सेवाज्येष्ठता देण्याचा निर्णय घेतला.