शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुबेर जेरबंद

By admin | Updated: August 8, 2015 02:11 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील प्रवक्ता बनण्याची इच्छा व्यक्त केलेल्या झुबेर अहमद खान या कथित पत्रकाराला

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील प्रवक्ता बनण्याची इच्छा व्यक्त केलेल्या झुबेर अहमद खान या कथित पत्रकाराला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त मोहिमेत गुरुवारी रात्री उशिरा येथे अटक केली. तो नवी मुंबईतील असून, त्याने फेसबुकवरील पोस्टवर याकूब मेमनला शहीद ठरवितानाच इसिससाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या पोस्टला लाइक करणाऱ्यांची चौकशी आणि त्याची प्रस्तावित योजना विचारात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचा मोबाइल नंबर मिळविला होता. त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या साह्याने त्याचा ठावठिकाणा दिल्लीतील वसंतविहार कॉलनीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेथे नेऊन चौकशी केली जाणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भादंविच्या विविध कलमांन्वये तसेच देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल केला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मला मुस्लिमांचा आवाज बनून समाजासमोर मुस्लिमांचे खरे चित्र मांडायचे आहे. धर्माच्या आधारावर मदत करणाऱ्यांचा इसिसकडून विश्वासघात केला जात नाही, असेही त्याने नमूद केले होते. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुबेर खान याने राज्यशास्त्रातून एमए केले आहे. त्याच बरोबर त्याने बॅचलर आॅफ जर्नालिझम मणिपाल युनिव्हर्सिटीतून केले आहे. झुबेर खान हा ऊर्दू वृत्तपत्रात काम करीत असल्याचे आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी काही साप्ताहिक चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इसिसचा प्रवक्ता बनण्यासाठी जात असल्याचे सांगून त्याने नवी मुंबई सोडली होती. तो दिल्लीतील इराकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटून पासपोर्ट सादर करणार होता.न्यायालयात जाणारजुबेरचे अकाउंट कोणीतरी हॅक केले असावे. त्याचे व आमच्या कुटुंबीयांचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नाहीत. जुबेरच्या अटकेविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आम्हाला नक्की न्याय मिळेल.-फक्रद्दीन खान, जुबेरचा छोटा भाऊयाकूबला म्हटले होते शहीदमुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी आरोपी याकूब मेमन याला ३० जुलै रोजी नागपुरात फाशी देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झुबेर खान याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना याकूबला शहीद संबोधून खळबळ उडवली होती. याकूबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी इसिसमध्ये दाखल होण्याची त्याने इच्छा व्यक्त करताच काहींनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.