शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

By admin | Updated: November 6, 2015 01:25 IST

यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची

- भाऊसाहेब येवले,  राहुरी(अहमदनगर)यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या पेरणी झालेली रब्बी ज्वारी गर्भावस्थेत असून महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर समाधानकारक परिस्थिती आहे़ स्वाती नक्षत्र ७ नोव्हेंबर रोजी संपत असून, या दरम्यान पाऊस झाला, तर ज्वारी उत्पादनात भरघोस वाढ होईल, परंतु पाऊस झाला नाही, तरी २० टक्के वाढ अपेक्षित आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यात तब्बल १६ लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी उभी असून, उत्पादन वाढण्याची चिन्हे असल्याचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ भारी जमिनीवर २९ टक्के, मध्यम जमिनीवर ४८ टक्के, तर हलक्या जमिनीवर २३ टक्के रब्बी ज्वारीचे पीक उभे असल्याची माहिती गडाख यांनी दिली़यंदा ज्वारी पेरणीपूर्वी पाऊस पडला नव्हता़ ९ सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला़ मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावली होती़ यंदा वरच्या थरात पाऊस उपयुक्त ठरला. यंदा केवळ २६२ मिलीमीटर पाऊस नगर जिल्ह्यात पडला़ मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते़ यावर्षी १४ दिवस पावसाने हजेरी लावली़ हा पाऊस ५० टक्के असला, तरी ज्वारीचे चित्र समाधानकारक आहे़ यंदा मात्र हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर आढळून आला़ या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोफायरीफास हे औषध १० लीटरला २५ मिली याप्रमाणे फवारावे, त्यामुळे दोन दिवसांत कीड आटोक्यात येईल, असे गडाख यांनी सांगितले.अशी घ्या काळजी़़़ज्वारीला तीन, पाच व आठ आठवड्यांच्या अंतराने कोळपण्या द्याव्यात़ अन्यथा जमिनीला दीड मीटर भेगा पडतात़ विरळणी करताना केवळ एकच कोंब ठेवावा़ हेक्टरी १ लाख ४८ हजार कोंब संख्या अपेक्षित आहे़ विरळणीमुळे ज्वारीच्या उत्पादनात २० टक्के वाढ होते़ खोडमाशीमुळे फुटवे फुटले असतील, तर त्यातून एक फुटवा ठेवावा़ज्वारी उत्पादक शेतकरी आत्माराम वाघ, ज्ञानदेव कुऱ्हे, लहू मडके, उत्तमराव आहेर, शिवाजी काकडे, शशिकांत पवार, भाऊसाहेब खैरे, बाळासाहे खरात यांनी रब्बी ज्वारी यंदा उत्पादन वाढविण्यास हातभार लावील, असा विश्वास व्यक्त केला़ शेतकऱ्यांनी ज्वारीची वेळेवर विरळणी केली आहे़ याशिवाय कोळपणी करण्यात आली आहे़