शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बुलेट ट्रेनचा प्रवास भुयारी मार्गाने?

By admin | Updated: September 16, 2014 01:00 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या बुलेट ट्रेनसाठी जपानसह आता चीननेही अर्थ आणि तंत्रसहाय्य पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. बुलेट ट्रेनच्या कामात रुची दाखवणा:या चीनच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी सीएसटी स्थानकाला भेट देतानाच मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत मुंबई आणि अहमदाबाद शहरात बुलेट ट्रेनभुयारी मार्गातूनच न्यावी, अशी सूचना यावेळी शिष्टमंडळाने केली.  मध्य रेल्वे प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. 
 चीनच्या परिवहन मंत्रलयाचे उपमंत्री आणि नॅशनल रेल्वे अॅडमिनिस्ट्रेशनचे मुख्य अधिकारी लू डाँग फू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकाला भेट देतानाच त्याची माहिती घेतली. यावेळी बुलेट ट्रेन कशाप्रकारे चालवता येईल याबाबत चर्चाही करण्यात आली. शहरी मार्गात बुलेट ट्रेन उन्नत मार्गाने चालवताना कशा अडचणी येतील यावर चर्चा करताना भुयारी मार्गाचा पर्याय चिनी शिष्टमंडळाने ठेवला. 
याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, या ट्रेनचे सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक भुयारी मार्गात ठेवून दोन्ही शहरात ही ट्रेन शिरताच ती भुयारी मार्गातून धावणो सोयीचे ठरेल. अशा प्रकारची ट्रेन चीनमध्ये धावत असल्याचे शिष्टमंडळाकडून मध्य रेल्वेच्या अधिका:यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईत ही ट्रेन शिरताच ती भुयारी मार्गाने धावावी, अशी सूचना त्यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही ट्रेन वान्द्रे-कुर्ला संकुलातून सोडण्याचा विचार रेल्वेचा आहे. त्यापेक्षा चर्चगेट किवा सीएसटी येथून सोडल्यास प्रवाशांना सोयीस्कर पडेल, असेही मत यावेळी मांडण्यात आले.  (प्रतिनिधी)
 
बुलेट ट्रेन भुयारातून वर येण्यासाठी 200 मीटर लांबीमागे एक मीटर उंची वाढू शकते. म्हणजेच ही गाडी दहा मीटर उंचीवर जाण्यासाठी दोन किलोमीटर लांब धावावी लागेल. मुंबईत उन्नत मार्ग उभारणो सध्या कठीण असून त्याला खर्चही अवाढव्य येतो. त्यामुळे भुयारी मार्ग हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले.