शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार कोठारी हत्याकांड; एकास अटक

By admin | Updated: June 29, 2015 02:06 IST

मध्य प्रदेशातील कटंगी येथील पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्या प्रकरणी तुमसर येथे योगेश कन्हैय्यालाल आहुजा (३२) यास त्यांच्या निवासस्थानी २६ जुनच्या मध्यरात्री मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली.

तुमसर (भंडारा) : मध्य प्रदेशातील कटंगी येथील पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्या प्रकरणी तुमसर येथे योगेश कन्हैय्यालाल आहुजा (३२) यास त्यांच्या निवासस्थानी २६ जुनच्या मध्यरात्री मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. हत्येचा मुख्य सूत्रधार राजेश नरकेसवानी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुमसर तालुक्यातील डोंगरी (बु.) चिखला येथे मँगेनिजच्या खाणी आहेत. मध्य प्रदेशातील कटंगी जवळील तिरोडी, भरवेली येथे मोठ्या प्रमाणात मँगेनिजचा साठा असल्यामुळे तुमसरातील व्यापारी त्याचा व्यवसाय करतात. त्यात योगेश आहुजा याचा समावेश होता. आहुजाचे कापड दुकानही आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या व्यवसायात अडसर ठरणारा तरुण पत्रकार संदीप कोठारी यांनी मँगेनिज व वाळूच्या अवैध तस्करीवर लेखन केले होते. त्यांच्या लिखानामुळे दुखावलेले मँगेनिज तस्करांनी एकत्र येऊन त्यांना संपविण्याचा कट रचला. त्यानुसार १९ जुनला कोठारी हे मित्रांसोबत दुचाकीने घरी जात असताना वाटेत अडवून त्यांच्या मित्रांना मारहाण करून कोठारींचे अपहरण करण्यात आले. कोठारी घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी कटंगी पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदविली होती. (प्रतिनिधी)२१ जून रोजी खून केल्यानंतर विशाल तांडी, ब्रजेश डहरवाल यांनी कटंगी पोलिसात आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. तर वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांना त्याचदरम्यान जळालेला मृतदेह आढळून आला. तो कोठारी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.