शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह पत्रकाराचा झाला मृत्यू

By admin | Updated: May 12, 2017 17:10 IST

भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 12 : कोल्हापूरातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला, तर या दुर्घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटी येथील कॅमेरामन - पत्रकार रघुनाथ शिंदे गव्याच्या हल्यात गंभीर जखमी होवून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले. आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून उसाचा पाला काढण्यासाठी उसात गेले होते. गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने त्या तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने पोवार हा जागीच ठार झाला. जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थाना या दुर्घटनेची माहिती दिली.हे वृत्त कळताच तात्काळ "बी न्यूज़"चे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते बांधावर उभा राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक देऊन 10-12 फुटांवर उडवून भिरकावून दिले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने आतड़ी बाहेर आली आणि दुसरे शिंग मांडीत घुसले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले असता उपचार सुरू असताना मृत झाले.