शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

By admin | Updated: November 8, 2015 00:26 IST

देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची

नागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा घटनाक्रम, यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस संघ जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत नाही, परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात थेट काँग्रेसविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मुळात काँग्रेस पक्षच संघाबद्दल असहिष्णू आहे. संघाची वाढ, तसेच जनतेमधून मिळणारी मान्यता या बाबी सहन करणे त्यांना कठीण झाले आहे, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले होते. डॉ. वैद्य यांच्या या प्रत्युत्तरामुळे संघ परिवारातील सदस्यही आश्चर्यचकित झाले होते.या संदर्भात भय्याजी जोशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ही संघाची भूमिकाच नसल्याचे वक्तव्य दिले. ‘देशात असहिष्णुतेसाठी संघालाचा जबाबदार धरण्याची परंपराच आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे? अशी आक्रमक भूमिका घेणे हे संघाचे धोरण नाही. आम्ही असे मतदेखील व्यक्त केलेले नाही,’ असे ते म्हणाले. संघाची नेमकी भूमिका काय?डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संघ आक्रमक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.