शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात

By admin | Updated: March 29, 2017 18:33 IST

राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 29 - राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरू झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे संघर्ष यात्रेच्या शुभारंभाच्या जाहीर सभेत बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले की, ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या तरी हे सरकार कर्जमाफी करत नाही. या सरकारमध्ये संवेदनाच राहिल्या नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, यांची योग्य वेळ येणार नाही. हे पुढच्या निवडणुकीत पुन्हा कर्जमाफीचे आश्वासन देतील, आम्हाला शेतक-यांच्या अडचणींची जाणीव होती म्हणून आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. या सरकारमध्ये संवेदना आणि निर्णयक्षमता नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही पोकळ गप्पा मारत नाही. आम्ही कर्जमाफी करून दाखवली. हे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सरकार वाचवण्यासाठी 19 आमदारांचे निलंबन करून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. न्याय मागणा-या शेतक-यांना मंत्रालयात मारहाण केली जात आहे.  शेतक-यांसाठी कर्जमाफी मागणे हा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला. याच सभेत बोलताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले की, आमदारांचे निलंबन म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.  सरकार निर्लज्ज असून पेटून उठलेले शेतकरी हे सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर आमदार विजय वडेट्टीवार यांनी, एकाही शेतक-याने कर्ज भरू नये, असे आवाहन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट येथील आत्महत्या केलेले शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप, एमआयएम या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली. करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास आजपर्यंत सरकारच्या एकाही मंत्र्याला वेळ मिळाला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करकाडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच करकाडे यांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. या संघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.