शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

डम्पिंग ग्राउंडसाठी संयुक्त समिती - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 8, 2016 04:25 IST

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच तेथील समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच तेथील समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. डम्पिंग ग्राउंडची समस्या सोडविण्याची मागणी करत चेंबूर येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी स्थानिकांनी आपल्या अडचणींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचून दाखविला. यावर, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना त्वरित कालबद्ध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. देवनार येथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सोमवारी पूर्ण केले जाईल. तसेच भविष्यात आगीच्या घटना आटोक्यात राहाव्यात यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या कामयस्वरुपी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच देवनार डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षाभिंतींच्या डागडुजीचे काम तातडीने पुर्ण केले जात असून वैज्ञानिक पद्धतीने कच-याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येत असल्याचे मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. देवनार येथील उपाययोजनांचा कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी चेंबूरकरांच्या शिष्टमंडळाला दिले.