शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जनताभिमुख अधिकारी महत्त्वाचे

By admin | Updated: April 5, 2017 01:01 IST

अधिकाऱ्यांवर विश्वास टाकल्यास ते झोकून काम करतात असा माझा अनुभव आहे.

पुणे : अधिकाऱ्यांवर विश्वास टाकल्यास ते झोकून काम करतात असा माझा अनुभव आहे. किल्लारी भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनातील सर्व व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अनेकदा राजकारण्यांनी सांगितलेली कामे तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावीच लागतात मात्र, जनतेची गरज ओळखून तसे निर्णय सरकारला घ्यायला लावणारे अधिकारी अधिक महत्त्वाचे असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले.माजी प्रशासकीय अधिकारी श्याम देशपांडे लिखित ‘सदसद्विवेक’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आ. ह. साळुंके या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘प्रशासकीय यंत्रणेला विश्वास दिल्यास, तेदेखील तुम्हाला कामाचा विश्वास देतात. संकटकाळात प्रशासन कशा पद्धतीने काम करते, हे आपण पाहिले आहे. अगदी प्रशासनाच्या तळातील कर्मचाऱ्यांपासून अधिकारी वर्गदेखील तहान-भूक आणि कुटुंब विसरून काम करीत असतो.’’ सबनीस म्हणाले, ‘‘आजची राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची घसरगुंडी सुरू आहे. त्यामुळे सध्या निरपेक्ष प्रशासकाची देशाला आवश्यकता आहे.’’ (प्रतिनिधी)>फडणवीस आणि पवारांची फिरकी कार्यक्रमाचे सूत्रसंचालकांना आपले नाव काय अशी विचारणा शरद पवार यांनी केली. तिकडून उत्तर आले (शुभदा) फडणवीस. पवारांनी मिश्किलपणे डोळे वर करीत, नागपूर ? अशी विचारणा करताच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले अनेक कार्यक्रमांत वक्त्यांची ओळख करून दिली जाते. अनेकदा त्या वक्त्यांनाही माहीत नसलेले उल्लेख (शब्दपेरणी) त्यात असतात. वक्त्यांचे भाषण झाल्यावरही काही वक्ते काय बोलले हे थोडक्यात सांगतो. बहुधा सूत्रसंचालकाने गृहीत धरलेले असते, भाषण श्रोत्यांच्या डोक्यावरून गेलेले आहे. पवारांच्या या वक्तव्यावरून कार्यक्रमाचा नूर एकदम पालटला. एक हास्याची लकेर सभागृहत पसरली.>समाजात असलेले सर्व दोष प्रशासनातदेखील दिसून येत आहेत. यात अपवाददेखील असतात. मात्र, आता या अपवादांचीदेखील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे समाजाचे पुढे काय होईल, याबाबत चिंता लागून राहिली आहे. खरेतर प्रशासन खंबीर हवे. प्रसंगी जरूरी असल्यास राजकीय व्यक्तींनी केलेल्या मतापेक्षा वेगळे मत व्यक्त करायला हवे. प्रशासनाने समाजाशी एकरूप व्हायला हवे, पण ही मूल्ये आता उरली नाहीत.- भाई वैद्य, ज्येष्ठ समाजसेवक