शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जोगेश्वरी परिसर नागरी समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: July 18, 2016 02:06 IST

जोगेश्वरी पूर्व येथील विविध समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात शुक्रवारी समस्यांचा पाऊस पडला

मनोहर कुंभेजकर/ गौरी टेंबकर,

मुंबई- जोगेश्वरी पूर्व येथील विविध समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात शुक्रवारी समस्यांचा पाऊस पडला. ‘लोकमत’ आणि ‘स्वराज लोकसेवा प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेघवाडी नाक्याजवळील बालविकास विद्यामंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यकमाला येथील ५०० सर्वधर्मीय नागरिक, विविध गृहनिर्माण संस्थांचे आणि मंडळांचे प्रतिनिधी आणि विशेषकरून महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी मंचावर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरक्षा घोसाळकर, जोगश्वरी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दोडमनी, के(पूर्व) विभागाचे सहायक अभियंता देवेंद्रकुमार जैन यांचे दूत म्हणून घनकचरा विभागाचे सहायक अभियंता तुषार पिंपळे, पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी राजेंद्र लोखंडे, विकास आराखडा (डीपी) तज्ज्ञ अँड ग्राँडफे पिमेंटा, आरजेएमडी स्कूलचे अध्यक्ष सहदेव सावंत व माजी प्राचार्य डॉ. अपेक्षा खामकर, म्हाडाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय ठाकरे, अ‍ॅड. माधवराव वाघ, माजी वरिष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकारी, आरे समाजसेवक सुनील कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्वराज लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला, तसेच प्रतिष्ठान आणि मुंबई महानगर पालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चासत्रात समस्या मांडणाऱ्या मेघा चव्हाण, बंड्या शिंदे, शैलेश नेस्त्रे, राजेंद रेडकर आणि प्रकाश भोसले यांचा यावेळी तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला.>सुरक्षा घोसाळकर यांनी सांगितले की, ‘१९८९ पासून प्रतिष्ठानच्या वतीने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी अनेक विधायक उपक्रम सातत्याने राबवले जातात. आषाढी एकदशीनिमित्त लोकमतरूपी विठ्ठलाला येथील समस्या सोडवण्याचे आम्ही साकडे घालतो. नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि समस्या पालिका प्रशासन, शासन यांच्या समन्वयाने सोडवण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक महिन्यानंतर येथील किती समस्या सुटल्या, याची आढावा बैठक ‘लोकमत’बरोबर आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई अग्निशमन दलातर्फे अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. पहिली महिला अग्निशमन स्वयंसेवक म्हणून जसे मी प्रशिक्षण घेतले, तसे जोगेश्वरीकरांनीही घ्यावे,’ >या शिक्षण संस्थेत इयत्ता १ली ते १०वीचे सुमारे ३५०० विद्यार्थी आहेत, परंतु शासनाकडून शाळेला अनुदान वेळेवर मिळत नाही. २०१४ चे अनुदान शासनाने दिले. मात्र, २००४ ते २०१३च्या अनुदानाची थकबाकी शासनाने दिली नाही. मग शाळा चालणार कशा? मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत.- सहदेव सावंत, अध्यक्ष, आरजेएमडी स्कूल, >मुलांवरील अत्याचार वाढत असल्यामुळे मुले सुरक्षित घरी येतील याची खात्री नाही. अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. मेघवाडीची मुले सुसाट बाइक चालवतात, त्याला आळा घालावा. मातोश्री संकुल, मजास डेपो, श्यामनगर तलाव, दुर्गानगर, आरे जोडरस्ता, कोकणनगर, सेंट जॉर्डन शाळा येथे मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. येथे रात्रीच्या वेळी अश्लील चाळे चालतात. - मेघा चव्हाण