शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची

By admin | Updated: March 11, 2016 01:53 IST

कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे. आतापर्यंत कलर्स व लोकमत सखी मंचच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे.

पुणे : कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे. आतापर्यंत कलर्स व लोकमत सखी मंचच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. याच शृंखलेत पुन्हा एकदा पती-पत्नीच्या नात्यातल्या प्रेमाच्या बंधनांना स्पर्धांमधून सर्वांसमोर आणणारा एक नितांतसुंदर कार्यक्रम म्हणजे - ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची.’ याअंतर्गत ३ स्पर्धा आणि तीनही स्पर्धांच्या विजेत्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या १० जोड्यांना प्रवेश दिला जाईल. यापेक्षा जास्त असल्यास प्राथमिक फेरीद्वारे अंतिम स्पर्धक निवडले जातील. अतिशय सुंदर विषय या निमित्ताने पती-पत्नीसाठी हाताळले जाणार असून, दोघांना आपल्या प्रेमाची, आपल्या नात्याची परीक्षा या स्पर्धांमधून द्यायची आहे आणि पुरस्कारदेखील जिंकायचे आहे. याव्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांसाठी बॉलिवूड जोडी ही मनोरंजक स्पर्धा ठेवली आहे. यात सिनेजगतातील जोडी बनून यायचे आहे, तसे गेटअप करायचे आहे व वेशभूषा करायची आहे. यात पतिपत्नी असणे आवश्यक नाही. यात दोन सखी किंवा बहीण-भाऊ किंवा पति-पत्नी असे भाग घेऊ शकतात. बेस्ट बॉलिवूड जोडी म्हणून विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. कलर्स चॅनलने नेहमीच अशा सुंदर विषयांवर मालिकांचे प्रसारण करून स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करून, तो कायम राखण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहे. याच प्रयत्नात आणखी एक निस्सिम प्रेमावर आधारित ‘कसम’ नावाची मालिका ७ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. एका मुलीचा आपल्या प्रेमावर इतका प्रचंड विश्वास असतो की, तो मिळविण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या प्रेमाला मिळविण्यात ती यशस्वी होते. ‘कसम’ ही सिरीयल रिषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्या तरुण- तरुणीवर आधारित असून, त्यांच्या प्रेमाच्या वाटेत प्रेमविरह आणि प्रेम अशा प्रवासाची सुंदर मांडणी करून प्रेम हेच जगण्याची आणि जगविण्याची खरी ताकत आहे, असे सांगितले आहे. अशा प्रेमाच्या कसम या सिरीयलसोबत वरील स्पर्धा आणि त्यातील विजेच्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार एकूणच जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची हा कलर्स व लोकमत सखी मंचचा कार्यक्रम प्रेमाच्या वेगळ्या जगात नेण्याची किमया करेल यात शंका नाही. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लोकमत कार्यालयात येऊन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक.(प्रतिनिधी)>पहिली स्पर्धा : बेस्ट जोडी (गीत) अतूट गायक जोडी- यामध्ये पती-पत्नी मिळून गाणे सादर करावयाचे आहे; पण गाणे पुनर्जन्मावर आधारित कोणत्याही पिक्चरचे असायला हवे.> दुसरी स्पर्धा : बेस्ट जोडी (अभिनय) अतूट अभिनय जोडी - यातसुद्धा कोणत्याही पुनर्जन्मावर आधारित कुठल्याही पिक्चरचे डायलॉग किंवा सीन पती-पत्नीने मिळून सादर करायचा आहे.