शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

तरूणाईच्या देशात रोजगाराचे आव्हान

By admin | Updated: May 29, 2016 00:33 IST

भारतासारख्या तरुणाईच्या देशासमोर रोजगाराचे फार मोठे आव्हान आहे. या उलट उद्योगासमोर पैसा, तंत्रज्ञानाच्या नव्हे तर रोजगारक्षम युवकांची समस्या आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध

अमरावती : भारतासारख्या तरुणाईच्या देशासमोर रोजगाराचे फार मोठे आव्हान आहे. या उलट उद्योगासमोर पैसा, तंत्रज्ञानाच्या नव्हे तर रोजगारक्षम युवकांची समस्या आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध असूनही बेरोजगारीची समस्या कायम असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कौशल्य विकास व उद्योजकता विभागाद्वारा शनिवारी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित विभागीय महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रूडी, ना. रणजित पाटील, ना. प्रवीण पोटे, आ. चैनसुख संचेती, आ. अनिल बोंडे, आदी उपस्थित होते. जोवर ह्यव्हॅल्यू अ‍ॅडीशनह्ण होत नाही, युवक कौशल्य प्राप्त करीत नाही, तोवर रोजगार मिळणार नाही. यासाठी कौशल्य प्राप्त करणे महत्वाचे आहे. शेतीमुळे ५५ टक्के रोजगार निर्मिती होते. त्यामध्ये राज्याचा वाटा ११ टक्के आहे. शेतीपुरक उद्योग वाढवावे लागतील, असेही ते सांगितले. (प्रतिनिधी)- रोजगाराच्या नावावर बोलविण्यात आलेल्या अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यातून आलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली. नोकरीच्या नावावर बोलविले मात्र रित्या हाती परत जावे लागत असल्याची प्रतिक्रिया बहुतांश पदवीधरांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. यासंबंधाने काही जण तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. तथापि आज कार्यालयाला सुटी होती. कौशल्य विकासात महाराष्ट्र अव्वलदेशाच्या ईतिहासात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास विभाग स्थापन केला. आजवर युवकांना केवळ पदवीशी जोडले गेले आहे. १० वर्षांच्या शिक्षणानंतर १० आठवड्यांचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. सार्वजनिक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षित युवकांची गरज आहे. विदेशात ८० टक्के कौशल्य प्रशिक्षित युवक असताना देशात हे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. या तुलनेत महाराष्ट्र कौशल्य प्रशिक्षणात प्रथम क्रमांकावर आहे.- राजीवप्रताप रूडी, कौशल्य विकास राज्यमंत्री, भारत सरकार