शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीचे ४०७ कोटी थकवले

By admin | Updated: August 2, 2016 05:28 IST

तेल, रसायनांच्या १२ नामांकित कंपन्यांनी जेएनपीटीचे भाड्यापोटी ३४६ कोटी रक्कम थकविली आहे.

मधुकर ठाकूर,

उरण- तेल, रसायनांच्या १२ नामांकित कंपन्यांनी जेएनपीटीचे भाड्यापोटी ३४६ कोटी रक्कम थकविली आहे. तर शिपिंग कंपन्या, एजंट, सीएफएस यांच्याकडेही भाड्याचे सुमारे ६३ कोटी रुपये थकीत असून, थकीत रकमेचा आकडा ४०७ कोटींच्या घरात पोचल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. थकबाकी वसुलीसाठी जेएनपीटीकडून कंपन्यांना सातत्याने नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र बड्या भांडवलदार कंपन्या जेएनपीटीच्या नोटिसांना केराचीच टोपली दाखवित आहेत. जेएनपीटीने आपल्या मालकीच्या अनेक जमिनी तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएसना भाड्याने दिल्या आहेत. तेल आणि रासायनिक कंपन्यांनी तर जेएनपीटी परिसरात मोठमोठे टँकफार्म उभारले आहेत. भाडेतत्त्वावर दिलेल्या भाडेकरूंना जेएनपीटी पाणी, वीज आणि देखभालीचाही खर्च करते. मात्र भाडेकरू कंपन्या मात्र जेएनपीटीला भाडे देण्यास चालढकलपणा करीत आहेत. त्यामुळे परिसरातील १२ तेल, रासायनिक कंपन्यांनी मागील काही वर्षांपासून जेएनपीटीची जुलै २०१६ अखेरपर्यंत ३४६ कोटींची रक्कम थकविली आहे. कंपन्यांबरोबरीनेच परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या काही सीएफएसनेही भाड्याची कोट्यवधींची रक्कम थकविली आहे. सीएफएसच्या थकीत रकमेच्या यादीत डीबीसी पोर्ट लॉजिस्टिक लिमिटेड आघाडीवर आहे. डीबीसी पोर्ट लॉजिस्टिककडे २५ कोटी ७२ लाख ४७ हजार ७४ इतकी रक्कम थकीत असल्याची माहिती जेएनपीटी अधिकृत सूत्रांनी दिली. थकबाकीदार तेल आणि रासायनिक कंपन्यांचा भाडेपट्टीचा करार पाच वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे. मात्र तरीही थकबाकीदार कंपन्या भाड्याने दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रापेक्षा अधिक पटीने जमिनीचा वापर करून कोट्यवधींचा नफा कमवित आहेत. मात्र जेएनपीटीच्याच जमिनीवर कोट्यवधींचा नफा कमविणाऱ्या तेल व रासायनिक कंपन्या थकीत रकमेचा भरणा करण्यास तयार नाहीत. जेएनपीटीने वारंवार नोटीस आणि थकीत रकमेच्या मागणीनंतरही थकबाकी रकमेचा भरणा करण्यास तेल, रासायनिक कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. महसूल बुडव्या या बड्या भांडवलदार कंपन्यांना केंद्र, राज्यातील मंत्री, राजकीय पुढारी, नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळेच कंपन्या जेएनपीटीला जुमानत नसल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. जेएनपीटीने तेल, रासायनिक कंपन्यांबरोबरच विविध कंटेनर यार्ड, कार्यालये, गाळे, दुकाने, निवासस्थानेही छोट्या - मोठ्या शिपिंग कंपन्या आणि एजंटांना भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्याकडे मागील वर्षापर्यंत ६१ कोटींची थकबाकी होती. यावर्षी यामध्ये वाढ झाली असून, थकबाकीचा आकडा सुमारे ६३ कोटींच्याही वर पोचला असल्याची माहिती जेएनपीटी अधिकृत सूत्रांनी दिली.