शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेजे रूग्णालयातून चिमुरडी हरवली बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने सुखरूप सापडली

By admin | Updated: May 10, 2014 21:05 IST

बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने जेजे रूग्णालयातून हरविलेली ९ वर्षांची गतीमंद मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहचली.

मुंबई - बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने जेजे रूग्णालयातून हरविलेली ९ वर्षांची गतीमंद मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहचली. सांताक्रूझ, कलिना परिसरात राहणारी ही चिमुरडी काल आपल्या मावशीसह जेजे रूग्णालयात आली होती. मावशीने या मुलीला संबंधीत रोगनिदान कक्षाबाहेरील रांगेत उभे केले आणि स्वत: काही कागदपत्रांची झेरॉक्स आणण्यासाठी गेली. पंधरा मिनिटे झाली तरी मावशी परत न आल्याने ही चिमुरडी घाबरली, बिथरली. रडत रडत, मावशीला शोधत ती रूग्णालयाबाहेर पडली आणि वरळीला जाणार्‍या बेस्टबसमध्ये चढली. दरम्यान, ही बस डॉकयार्ड रोड परिसरात आली तेव्हा प्रवाशांना तिकिटे देण्यात व्यस्त असलेला कंडक्टर या मुलीपर्यंत पोहोचला. त्याने या चिमुरडीला कुठले तिकिट देऊ, अशी विचारणा केली. मात्र तिला काहीच बोलता येत नसल्याने व ती रडू लागल्याने कंडक्टरने आपुलकीने तिची चौकशी केली. तुझे नाव काय, तू कुठून आलीस, कुठे जायचे आहे, सोबत नातेवाईक का नाहीत, असे प्रश्न त्याने या चिमुरडीला विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने प्रसंगावधान राखून या मुलीला वरळी पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत या चिमुरडीच्या मावशीने अल्पवयीन भाची चोरीला गेल्याची बोंब ठोकत रूग्णालय डोक्यावर घेतले. प्रकरण जेजे पोलीस ठाण्यात पोहोचले. जेजे पोलिसंानी लागलीच मुलीचे वर्णनाचा बीनतारी संदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यात धाडला. त्यामुळे कंडक्टर मुलीला पोलीस ठाण्यात नेण्याआधीच वरळी पोलिसांना जेजे रूग्णालयातून अल्पवयीन मुलगी चोरीला गेल्याची माहिती मिळालेली होती. त्यामुळे लागलीच वरळी पोलिसंानी जेजे पोलिसांशी संपर्क साधून कंडक्टरने सोबत आणलेल्या मुलीची माहिती कळवली. पुढे वरळी पोलीस या चिमुरडीला घेऊन जेजे पोलीस ठाण्यात गेले. तेथे या मुलीला तिच्या मावशीच्या ताब्यात देण्यात आले. हा सर्व थरार अवघ्या तासाभरात रंगला.बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने ही चिमुरडी सुखरूपपणे आपल्या नातेवाईकांकडे परतल्याची प्रतिक्रिया जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शशिकांत सुर्वे यांनी व्यक्त केली.