शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जे.जे. रुग्णालयातही आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

By admin | Updated: November 10, 2014 04:28 IST

महापालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात देखील डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी पाच ठिकाणे आढळून आली आहेत

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात देखील डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी पाच ठिकाणे आढळून आली आहेत. रुग्णालयाच्या ज्या भागामध्ये अळ््या आढळून आल्या आहे, तिथल्या संबंधित व्यक्तींना कीटकनाशक विभागाने शुक्रवारी नोटीस पाठविल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. जे. जे. रुग्णालयाचा परिसर मोठा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून राहते. यामुळेच या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्ये जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी वसाहतींमध्ये २ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आढळले होते. आता आणखी तीन ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळून आले आहे. तसेच सरकारी रक्तपेढीच्या बाजूलाही पैदास होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जे.जे. रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. आम्ही रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवित आहोत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. मात्र जे.जे. रुग्णालय परिसरामध्ये दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. तरीही रुग्णालय परिसरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांना, त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. निवासी डॉक्टरांनाही डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)