शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सहकार तत्त्वावरील ‘जिजामाता हॉस्पिटल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 01:11 IST

१५० बेडचे मल्टिस्पेशालिटी : जुलैपासून सुरुवात; संस्थांसह व्यक्तिगत सभासदांना उपचारात सवलत

राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरात सहकार तत्त्वावरील पहिले १५० बेडचे मल्टिस्पेशालिटी ‘जिजामाता को-आॅपरेटिव्ह हॉस्पिटल’ येत्या जुलै महिन्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी सहकार खात्याने पुढाकार घेतला असून, सहकारी संस्थांसह व्यक्तिगत सभासदांना येथे सवलतीच्या दरात उच्चदर्जाचे उपचार मिळतील. ‘अ’ वर्ग संस्थांना दहा हजार, तर व्यक्तिगत (तात्पुरते सभासद) एक हजार भागाची रक्कम राहणार आहे, त्यानुसार त्यांना सुविधा मिळणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही सहकाराने आले पाहिजे, यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘जिजामाता को-आॅप. हॉस्पिटल, कोल्हापूर’ या नावाने संस्था नोंदणी केली असून, त्याच्या भागभांडवल गोळा करण्याचे काम सुरू आहे. ‘वृषाली हॉटेल’समोरील तीन मजली इमारतीत हे हॉस्पिटल सुरू होत असून, डॉ. भीष्म सूर्यवंशी हे प्रमुख म्हणून काम करणार आहेत. सहकारी संस्थेप्रमाणे या हॉस्पिटलचे संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. पहिल्या टप्प्यात साखर कारखाने, सूतगिरणी, मोठ्या बँका, सचिव केडर यांचा समावेश करण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरनंतर कोल्हापुरात!यापूर्वी राज्यात एकमेव सोलापुरात अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू आहे. त्यानंतर कोल्हापुरात सुरू होत आहे. ‘सहकाराची पंढरी’ म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरात ते अधिक जोमाने कार्यरत होईल.हे होणार उपचार-कॅज्युल्टी, फार्मसी, अ‍ॅक्सिडेंट, ट्रामा केअर युनिट, स्पायरल सी. टी. स्कॅन, एक्स-रे युनिट, अल्ट्रा साऊंड स्कॅन युनिट, लॅब, आय.सी.यू. आय.सी.सी.यू, नवजात शिशुसाठी एन.आय.सी.यू., बालरुग्णांसाठी आय.सी.यु. अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.शेअर्स हस्तांतराला बंदी हे हॉस्पिटल सहकार कायद्यातंर्गत नोंदणी झाले असले तरी हॉस्पिटलचा शेअर्स मात्र कोणाला विकता येणार नाही किंवा हस्तांतर करता येणार नाही. भागधारकांना या सलवती मिळणार -बाह्यरुग्ण विभागातील बिलात २० टक्के सवलतसर्व प्रकारच्या लॅब तपासणीमध्ये २० टक्के सवलतएक लाखापर्यंत अपघात विमा संरक्षणमोफत रुग्णवाहिका सेवा हॉस्पिटलच्या औषध बिलासाठी ५ टक्के सवलत जनरल वॉर्ड, स्पेशल रूम व आय.सी.यू. मध्ये २० टक्के सवलत वर्षातून एकदा मोफत तपासणीशेअर्स ग्राहकांच्या संपर्कातून येणाऱ्या व्यक्तीस १० टक्के सवलत