शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिया खान आत्महत्या प्रकरण : सूरजच्या पासपोर्ट याचिकेवर उत्तर द्या

By admin | Updated: March 9, 2016 05:40 IST

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सूरज पांचोली याने पासपोर्ट परत मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सूरज पांचोली याने पासपोर्ट परत मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्या. मृदुला भाटकर यांना दिल्यानंतर त्यांनी सीबीआयला या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश दिले. या अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे.व्यावसायिक कारणास्तव परदेशात जायचे आहे. त्यासाठी पासपोर्ट देण्याचे आदेश तपास यंत्रणेला द्यावेत. परदेशातून भारतात परत आल्यानंतर पासपोर्ट तपास यंत्रणेकडे परत करेन, असेही पांचोलीने अर्जात म्हटले आहे.

३ जून २०१३ रोजी जिया खानने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. २ जुलै रोजी सूरजची जामिनावर सुटका करण्यात आली.

मात्र जियाची आई राबिया खान हिने या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने जुलै २०१४मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयनेही तपास केल्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे, असे म्हणत सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले आहे. (प्रतिनिधी)