शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिया खान खटला; सुनावणीला स्थगिती

By admin | Updated: June 28, 2017 01:33 IST

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाअधिवक्ते उपस्थित नसल्याने उच्च न्यायालयाने या खटल्याला १३ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. न्या. अनिल मेनन यांनी १९ जून रोजी जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला एका आठवड्याची स्थगिती देताना राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मात्र मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी महाअधिवक्तेच न्यायालयात उपस्थित नसल्याने न्या. मेनन यांनी खटल्याला स्थगिती दिली. ‘या प्रकरणात दोन तपास यंत्रणा सहभागी आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्याची मुभा आहे का? हा प्रश्न उपस्थित केला,’ असे न्या. ए. के. मेनन यांनी गेल्या सुनावणीत म्हटले होते. विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीनंतर सत्र न्यायालयाने सीबीआयला याबाबत अर्ज करण्याची परवानगी दिली नाही, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. राबिया यांनी यापूर्वी सीबीआयविरुद्ध केस लढवण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलाचीच सरकारने खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली होती. यावर सरकार सीबीआयवर विशेष सरकारी वकील लादू शकते का,’ असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.