शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’

By admin | Updated: May 10, 2016 03:52 IST

अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला.

अर्जुन कर्पे, कवठेमहांकाळअवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथे सोमवारी एका कापड दुकानाचे उद्घाटन रिंकू राजगुरू हिच्या हस्ते ठेवण्यात आले होते. गावात आर्ची येणार, ही बातमी आठवडाभर सोशल मीडियावरून अगोदरच पसरली होती. आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सकाळपासूनच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जत, मिरज, आटपाडी, कर्नाटकातून अनेक तरु णांनी हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आली असता, युवावर्गाने प्रचंड गर्दी केल्याने रिंकूला गाडीतून उतरणेही कठीण झाले. यावेळी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर रिंकूला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी व तिच्या खासगी रक्षकांनी आणले. तोपर्यंत संपूर्ण गर्र्दी ‘सैराट’मय होऊन ‘झिंग, झिंग, झिंगाट’च्या तालात नाचत होती. गर्र्दी प्रचंड झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही गर्दीला आटोक्यात आणता आले नाही. अर्ध्या तासात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना गर्दीला पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी रिंकू राजगुरूला मोठ्या प्रयत्नाने पोलिसांनी गर्दीतून वाट काढून देत शहरातून सुखरूप बाहेर काढले. तिची गाडी गर्दीतून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी गाडीचा आरसा फुटला. रस्त्यावर पडलेल्या आरशाच्या तुकड्यातही तरुणाई आर्चीची छबी शोधत होती. (वार्ताहर)