मुंबई : राज्यातील जलसंधारणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी जलजागृतीचे काम करणाऱ्यांना महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेसंदर्भातील चर्चेला उत्तर देताना शिंंदे बोलत होते.जलजागृतीचे काम करणारे पत्रकार, नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुढील आठ दिवसांत या पुरस्काराबाबतची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा उद्देशाने राबविलेली जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
जलमित्र पुरस्कार देणार - राम शिंंदे
By admin | Updated: August 4, 2016 04:42 IST