शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

दागिन्यांच्या नोंदीत, मोजमापात गोलमाल

By admin | Updated: February 4, 2015 00:02 IST

मूल्यांकनाचा पत्ता नाही : दानपेट्यांतील व्यवहारही संशयास्पद

इंदुमती गणेश - कोल्हापूर -अंबाबाई व जोतिबा देवस्थानला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांच्या नोंदींत तफावत आहे. मूळ पावती एका दागिन्याची आणि भक्ताला देण्यात आलेली पावती दुसऱ्या दागिन्याची असे प्रकार दोन्ही देवस्थानांमध्ये उघडकीस आले आहेत. सुदैवाने या दोन मंदिरांसह सात देवस्थानांमधील दागिन्यांचे आता मूल्यांकन झाले असले तरी अन्य तीन हजार मंदिरांमध्ये देवाला किती अलंकार येतात, याबाबतच्या नोंदी नाहीत. रेकॉर्डमध्येही अक्षम्य चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही मंदिरांतील दानपेट्यांच्या रकमेचे व्यवहारही संशयास्पद आहेत.करवीरनिवासिनी अंबाबाईला भक्तांनी दागिना अर्पण केला की ते सांगतील त्यानुसार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्या नोंदी केल्या जातात. नंतर हे अलंकार खजिनदाराकडे सुपूर्द केले जातात. त्या दागिन्यांतील सोन्याची शुद्धता, वजन गोल्ड व्हॅल्युएटरकडून न तपासताच दागिने ताब्यात घेतले जातात. प्रत्येक मौल्यवान वस्तूला विशिष्ट अनुक्रमांक असणे आवश्यक असते. त्यानुसार तो अलंकार सापडला पाहिजे. १९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे प्रत्यक्षात सोन्याची मोहनमाळ मिळाली. १८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली; मात्र त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद आहे. रजिस्टरमध्येही नथीचाच उल्लेख आहे. मग दोन किलो चांदी गेली कुठे? हे प्रकरण फक्त एक उदाहरण आहे. बऱ्याचदा दागिन्यांच्या नोंदी करताना त्यांचे अनुक्रमांकही चुकीचे टाकले जातात; त्यामुळे एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले. शिवाय पावत्यांनुसार दागिन्यांची रजिस्टरला नोंद नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातदेखील म्हटले आहे. बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे यात मारण्यात आले आहेत. या अलंकारांची नोंद जाप्तेबुकमध्ये केली जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोठेही त्याची झेरॉक्स प्रत नाही. जोतिबा देवस्थानातही अलंकारांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. नोंदीतील गडबड१९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे मिळाली सोन्याची मोहनमाळ१८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली. त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर मात्र सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद.एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास. बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे लेखापरीक्षणात.निष्काळजीपणाच जास्त...२०१३ मध्ये अंबाबाई, जोतिबा, दत्तभिक्षालिंग, ओढ्यावरचा गणपती अशा एकूण सात देवस्थानांकडील दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यानुसार त्याच्या सुयोग्य नोंदी ठेवल्या गेल्या. मात्र, दागिने नोंदीतील निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे भ्रष्टाचार होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच दागिने चुकून गहाळ झाल्याचे प्रकरण घडले होते. नंतर त्यांनी ते भरले. यावरून याबाबत किती काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, याचे गांभीर्य इतक्या वर्षांत व्यवस्थेला जाणवले नाही.रथाची चांदी नक्की किती ?देवस्थान समितीने दिलेल्या खुलाशात देणगी स्वरूपात आलेली चांदी ४५२ किलो असून, समितीने २० किलो चांदी खरेदी केल्याचे नमूद आहे. २०१० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात हीच चांदी २८३ किलो व देवस्थानची २० किलो असे नमूद केले आहे. मग १७० किलो चांदी गेली कुठे, असा प्रश्न येतो.