शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजला १.६० लाखांचा दणका

By admin | Updated: February 9, 2017 05:31 IST

स्वत:चे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाचे नुकसान करणाऱ्या आणि त्यांना योग्य पर्यायी व्यवस्थाही न करून देणाऱ्या

ठाणे : स्वत:चे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाचे नुकसान करणाऱ्या आणि त्यांना योग्य पर्यायी व्यवस्थाही न करून देणाऱ्या जेट एअरवेजला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांच्या दंडासह ट्रीपचे आर्थिक नुकसान म्हणून १ लाख २५ हजार देण्याचे आदेश दिले आहेत.मनीष पाटील यांनी कुटुंबीयांसह वैष्णोदेवी येथे जाण्यासाठी ४ मार्च २०१२ करिता जेट एअरवेजच्या सेवेची ३ तिकिटे बुक केली. ७ मार्चच्या परतीच्या प्रवासाचीही तिकिटे बुक केली होती. ४ मार्चच्या प्रवासासाठी पाटील २ तास आधी विमानतळावर चेकइन काउंटरवर पोहोचले असता त्यांना सिस्टीम फेल आणि नंतर आसने भरल्याचे सांगून बोर्डिंग पास दिला नाही. त्यानंतर, दुसऱ्या विमानाने जाण्यास सुचवले. मात्र, दुसरे विमान मुंबई ते दिल्लीच असल्याने पुन्हा तेथून जम्मूकरिता कनेक्टेड विमान नव्हते. त्यामुळे पाटील यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि संपूर्ण खर्च वाया गेल्याने एअरवेजविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. तर, विमानाचे ओव्हर बुकिंग झाल्याने पाटील यांनी प्रवास केलाच नाही. त्यामुळे ते आपले ग्राहक नाहीत. त्यांना पर्याय म्हणून मुंबई-दिल्ली व दिल्ली-जम्मू विमानाची सोय करून देतो अथवा प्रतिव्यक्ती ४ हजार नुकसानभरपाई देतो, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला, असे जेट एअरवेजच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता, पाटील यांनी जेट एअरवेजच्या सेवेसाठी शुल्क भरून मधुरम ट्रॅव्हल्सतर्फे ३ तिकिटे कन्फर्म केल्याचा पुरावा अभिलेखावर आहे. पाटील यांना बोर्डिंग पास दिले नसल्याचे एअरवेजने मान्य केले आहे. दुसऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त बुकिंग घेतल्याने पाटील यांना शुल्क भरूनही आसने उपलब्ध झाली नाही, तर पाटील यांनी आरक्षण केलेल्या विमानाचे किती बुकिंग होते, याचा अहवाल मागवूनही एअरवेजने तो दिला नाही. परिणामी, पाटील यांना सदोष सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे जेट एअरवेजने पाटील यांना मानसिक त्रास व न्यायिक खर्च म्हणून ३५ हजार आणि ट्रीपचे आर्थिक नुकसान म्हणून १ लाख २५ हजार द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)