शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जेईईचा अ‍ॅडव्हान्सचा कटआॅफ वाढला

By admin | Updated: June 12, 2017 01:47 IST

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे

पुणे : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे. देशभरातील २३ आयआयटीमध्ये ११ हजार ३२ जागा उपलब्ध असून, रँक मिळालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांमध्ये तिथल्या प्रवेशासाठी स्पर्धा होणार आहे. या परीक्षेत पुण्यातील साधारणत: ३०० विद्यार्थ्यांना रँक मिळविण्यात यश आले आहे. देशभरातून १ लाख ७१ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी किमान ३५ टक्के गुण मिळविणाऱ्या ३० हजार विद्यार्थ्यांना रँक देण्यात आली आहे. पुण्याचा अक्षत चुघ हा देशात दुसरा आला, त्याचबरोबर इतर अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. देशभरातून जेईई मेन्स परीक्षेसाठी बसलेल्या १२ लाख विद्यार्थ्यांपैकी १.३६ लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून होते, त्यापैकी पुण्याचे १५ हजार विद्यार्थी होते. त्यातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी एक हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. मागील ८ वर्षांत पुण्यातील जेईई अँडव्हान्स परीक्षेत रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. २००१मध्ये केवळ २, तर २०१०मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांना केवळ १०० आयआयटी रँक प्राप्त झाल्या होत्या यंदाच्या वर्षी हा आकडा ३००पर्यंत पोहोचला आहे. जेईई परीक्षेचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले, ‘‘जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित झाल्यापासून गेल्या ११ वर्षांतील जेईई अ‍ॅडव्हान्स २०१७ची परीक्षा ही अत्यंत सोपी होती. अपेक्षेनुसार विशिष्ट रँकसाठीच्या कट आॅफ गुणांमध्ये वाढ झालेली आहे. उदा. २०१६ मध्ये आॅल इंडिया रँक २००० रँकसाठी ४३.५५%, तर २०१५ मध्ये ४९ % कटआॅफ होता. मात्र, यावर्षी हा कटआॅफ ६८% गुणांवर आला आहे.’’ जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चाटे शिक्षण समूहाचे २२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सोहन सावंत, शीतल बिजले, अनुप गुरव, हितेश गुंजाल, अदिती खुर्द, गार्गी पाटील, रोहन पाटील, वर्षा सूर्यवंशी, स्नेहल कांबळे यांना रँक मिळविण्यात यश आले.