शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकवर जीप आदळल्याने दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 18:31 IST

- सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील दामाजी साखर कारखाना पाटीजवळ रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या ट्रकवर जीप आदळली़

ऑनलाइन लोकमतमंगळवेढा, दि. 15 - सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील दामाजी साखर कारखाना पाटीजवळ रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या ट्रकवर जीप आदळली़ या अपघातात जीपमधील दोघे जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले आहेत़ ही घटना १५ जुलै रोजी घडली़पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नकार्य झाल्यानंतर देवदर्शनासाठी कोल्हापूर येथे नितळी (जि़ उस्मानाबाद) येथील भोसले व जाधव कुटुंब जीप (क्ऱ एम़ एच़ १३ ए़ झेड़ २५७२) ने निघाले होते़ त्यांची गाडी मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना पाटीजवळ आली असता तेथे पंक्चर काढण्यासाठी उभारलेल्या ट्रक (क्ऱ सी़ जी़ ०४ ए़ सी़ ८३८२) वर जोरदार आदळली़ या अपघातात देवकन्या संतोष पडवळ (वय ३५) व साहिल हणमंत भोसले (वय ११) हे दोघे जागीच ठार झाले तर प्रशांत साहेबराव जाधव (वय २५), साहेबराव रामराव जाधव (वय ६०), बापूसाहेब भोसले (वय ३५), समाधान भोसले (वय ३०), शशिकांत साहेबराव जाधव (वय २३), आशा भोसले (वय २३) सर्व रा़ नितकी, जि़ उस्मानाबाद तसेच संतोष शिवाजी पडवळ (वय ४०), सुदर्शन संतोष पडवळ (वय १४), साक्षी संतोष पडवळ (वय १२) सर्व रा़ उस्मानाबाद हे गंभीर जखमी झाले आहेत़ या सर्व जखमींना हवालदार आबासाहेब डोंगरे यांनी गाडीमधून बाहेर काढून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ अपघात इतका भीषण होता की जीपचा पुढील भाग चक्काचूर झाला़ या घटनेची माहिती चालक सच्चिदानंद श्याम शिंदे (रा़ अरणी, जि़ उस्मानाबाद) यांनी मंगळवेढा पोलिसांना दिली़ अधिक तपास सपोनि अभिषेक डाके करीत आहेत़ (वार्ताहर)