शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जेईईची तयारी आता एमकेसीएलच्या सेंटरमध्ये

By admin | Updated: May 20, 2014 21:27 IST

११, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ हजार प्रश्नांसह टेस्ट सीरिजची सुविधा

अकोला : अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जॉइंट एंटरन्स एक्झाम (जेईई) ची तयारी अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थी दहावीनंतरच जेईईच्या तयारीला लागतात. अत्यंत मोजक्या महाविद्यालयात जेईई मेनच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळत असल्याने यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी एमकेसीएलने ११, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मास्टरिंग जेईई हा अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला असल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक विवेक देशमुख यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे जेईईसारख्या परीक्षांचा शिकवणी वर्ग लावणे कठीण आहे. त्यामुळे एमकेसीएलने या विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरात वर्षभर ऑनलाईन कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेईई मेनची तयारी महाविद्यालयात, नजीकच्या कॉम्पुटर सेंटरवर किंवा इंटरनेटवर उपलब्ध असल्यास घरबसल्याही करण्याची सुविधा एमकेसीएलने करून दिली आहे. ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम सुरू असतानाच विद्यार्थ्यांना दोन वर्ष सातत्याने मास्टरिंग जेईईचा अभ्यास करता येणार आहे. १२ वीला असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचे मोड्युल तयार करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी २५ आठवड्याच्या या कोर्समध्ये ११ वीच्या ६७ तर १२ वीच्या ७४ टेस्ट घेण्यात येणार आहेत. यासोबतच ११ वीच्या ५९ तर १२ वीच्या ६६ कॉम्बो टेस्ट घेण्यात येणार आहे. फायनल टेस्टमध्ये ११ वीच्या २१ तर १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या २१ टेस्ट घेण्यात येणार आहे. ऑनलाईनसोबतच ऑफलाईनही ही परीक्षा घेण्याची सुविधा राहणार आहे. दोन या टेस्ट सीरिजमुळे विद्यार्थ्यांना ई-टेस्ट आणि मॉकटेस्टद्वारे परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. यासाठी तब्बल १६ हजार प्रश्न उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर त्यांना उत्तरे पीडीएफ स्वरूपात मिळणार असून, चुकलेल्या उत्तरांची कारणेही ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्सद्वारे तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असून, चर्चा करण्यासाठी ब्लॉगही उपलब्ध राहणार असल्याची माहिती विवेक देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला अमोल सोनोने व जिल्हा समन्वयक अतुल खरोडकार उपस्थित होते.