जेईई मेनमध्ये राज्यात कपिल वैद्य पहिलामुंबई : देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीतील विविध व्यावसायिक प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मेन या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत झारखंडमधील किशल्य राज ३६0 पैकी ३५0 गुण मिळवत देशात पहिला, तर अकोला येथील कपिल वैद्य याने ३३५ गुण मिळवत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, जेईई परीक्षेतील टॉपर्सची नावे अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीत.कपिल वैद्य अकोला येथील दावले कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर मुंबईतील पेस ज्युनिअर सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ कोठारी ३३१ गुण मिळवत राज्यातून दुसरा तसेच रुपांशू गणवीर हा नागपूर येथील विद्यार्थी मागासवर्गीयांमधून देशात पहिला आला आहे. त्याला ३२८ गुण मिळाले आहेत. नवी मुंबईतील डीपीएस महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत गर्ग ३२६ गुण मिळवत राज्यातून चौथा आला आहे.जेईई मेनची पेन आणि पेपरबेस परीक्षा ६ एप्रिल रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यानंतर कम्प्युटर बेस परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला देशभरातून १३ लाख ५६ हजार विद्यार्थी बसले होते. देशभरातून १ लाख ५0 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी निवडण्यात आले आहेत. ही परीक्षा २५ मे रोजी देशभरात परीक्षा होणार असून, ७ जुलै रोजी ऑल इंडिया रँक घोषित करण्यात येणार आहे........संगणक विज्ञान शाखेत जायचे आहेसुरुवातीला दोन ते तीन तास अभ्यास करत होतो. परीक्षेच्या चार महिन्यांपासून आठ ते नऊ तास अभ्यास करण्यास सुरुवात केली. अॅडव्हान्स परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास आयआयटी मुंबईत संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. - पार्थ कोठारी (३३१ गुण)इलेक्ट्रीकल किंवा संगणक विज्ञानसाठी प्रयत्नकाही छोट्या चुकांमुळे गुण कमी झाल्याची खंत आहे. पण अॅडव्हान्स परीक्षेत अधिक गुण मिळवून आयआयटी मुंबईत इलेक्ट्रीकल किंवा संगणक विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - सिद्धांत गर्ग (३२६)संगणक विज्ञान शाखेत प्रवेश हवापवई आयआयटीमध्ये संगणक विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. येत्या अॅडव्हान्स जेईई परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक कष्ट घेईन. - रुपेश गणवीर (३२८)
जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर
By admin | Published: May 03, 2014 9:37 PM