शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जयमहेश कारखान्याने दाखविला दोनशे कामगारांना घरचा रस्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 20:33 IST

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १८ -  माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या विरोधात कामगार युनियनच्या वतीने सोमवारी कारखान्यासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जय महेश साखर कारखान्यात काम करणाऱ्या दोनशे मजुरांना कसलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या प्रकारामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काढून टाकण्यापूर्वी कामगारांना विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र  असा कुठलाही प्रयत्न साखर कारखाना प्रशासनाकडून झाला नाही. परिणामी दोनशे गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात संतप्त कामगारांनी कारखानास्थळावर ठिय्या मांडला आहे. मात्र कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी एकही अधिकारी पुढे आला नाही. आम्हाला तात्काळ काम द्या, त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कारखान्याकडे पैसे आहेत, मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कारखान्याने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे आम्हा कामगारांवर अन्याय झाला असल्याचे दिलेल्या पत्रकात कामगारांनी म्हटले आहे. खाजगी तत्वावर चालणाऱ्या जय महेश साखर कारखान्याने घेतलेल्या निर्णयामुळे सोमवारी कामगार आक्रमक झाले होते. या निर्णयामुळे दोनशे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.हा तर व्यवस्थापनाचा निर्णयसोमवारी जेंव्हा कामगारांनी ठिय्या आंदोलन केले तेंव्हा कामगारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रशासनातील एकही अधिकारी पुढे आला नाही. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार कामगार आंदोलकांनी केला आहेकामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही काहीच करू शकत नाहीत. कामगारांबाबतचे काही वाद न्यायालयात देखील सुरू आहेत. व्यवस्थापनाचे निर्णय आहे.- अशोक पवार, जय महेश साखर कारखाना व्यवस्थापक