शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टुडिओ होणार ‘ऐतिहासिक वारसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:36 IST

कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ ‘ऐतिहासिक वारसा’ म्हणून जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ ‘ऐतिहासिक वारसा’ म्हणून जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मागे घेतली आहे. लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयातही राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजून कौल दिला होता.राज्य सरकारने २०१२ मध्ये लता मंगेशकर यांच्या मालकीच्या कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा समावेश ‘ऐतिहासिक वारसा’च्या यादीत केला. मात्र त्यापूर्वी सरकारने कोणत्याच कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या नाहीत. त्यामुळे सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात केली होती.एकीकडे कोल्हापूर महापालिका हा स्टुडिओ मोडकळीस आल्याचे सांगते तर दसुरीकडे सरकार याच स्टुडिओला ऐतिहासिक वारशाचा दर्जा देते, असे मंगेशकर यांनी याचिकेत म्हटले होते.मात्र उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळत लता मंगेशकर यांना सरकारने बजावलेल्या नोटीसची पूर्ण कल्पना होती, असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळली. लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र आता त्यांनी ही याचिकाच मागे घेतली आहे. वाद निवळलाराज्य सरकारने २०१२ मध्ये लता मंगेशकर यांच्या मालकीच्या कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा समावेश ‘ऐतिहासिक वारसा’च्या यादीत केला. सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी याचिका लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र आता त्यांनी ती मागे घेतल्याने हा वाद निवळला आहे.