शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी, उजनी धरणात अद्याप पाणी का सोडले नाही?

By admin | Updated: August 2, 2016 05:45 IST

मराठवाड्याच्या जायकवाडी आणि उजनी धरणांत पाणी सोडण्याचा वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याचे पालन का झाले नाही

मुंबई : नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी आणि उजनी धरणांत पाणी सोडण्याचा वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याचे पालन का झाले नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकार व महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक महामंडळाला ९ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.याशिवाय नाशिक-नगरच्या धरणाचे पाणी नियबाह्यपणे कालव्यांद्वारे वळवण्यात येत असल्याने, न्यायालयाने गोदावरी- मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना न्यायालयात वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश देत, याबद्दल त्यांनाही स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.नाशिक-नगरची धरणे तुडुंब भरून वाहत असूनही, राज्य सरकार या धरणांतील पाणी मराठवाड्याच्या जायकवाडी व उजनी धरणांत सोडत नाही. उलट हे पाणी अडवण्यासाठी गोदावरी-मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळ (जीएमआयडीसी) कालव्यांद्वारे अन्य धरणांत वळवत आहे. राज्य जलसंपत्ती नियामक महामंडळाच्या (एमडब्ल्यूआरआरए) नियमानुसार, सिंचन क्षेत्राच्या मर्यादेबाहेर पाणी सोडले जाऊ शकत नाही, तरीही जीएमआयडीसी धरणांतील पाणी कालव्यांद्वारे वळवत आहे. हा शिक्षापात्र गुन्हा आहे, असे याचिकाकर्ते डॉ. संजय पाटील यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाला सोमवारच्या सुनावणीत सांगितले.‘आम्ही वारंवार आदेश देऊनही अद्याप जायकवाडी व उजनी धरणांत पाणी का सोडले नाही? आम्हाला याबाबत स्पष्टीकरण द्या,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत राज्य सरकार व एमडब्ल्यूआरआरआयला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.नियमबाह्यपणे नाशिक-नगरच्या धरणांतील पाणी कालव्यांद्वारे वळवून नाशिक-नगरला पूर आणायचा आहे का? कायद्यात तरतूद नसतानाही सिंचन क्षेत्राच्या बाहेर कालव्यांद्वारे पाणी वळवता कसे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत, न्यायालयाने जीएमआयडीसीच्या कार्यकारी संचालकांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)>समान तत्त्वावर वाटप का नाही? समान तत्त्वावर पाणीवाटप का करण्यात आले नाही, यापुढे वर्षभर पाण्याचे नियोजन कसे करण्यात येणार आहे, याचीही तपशीलवार माहिती राज्य सरकारला द्यावी लागणार आहे.