शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जय मल्हार शाळेची मान्यता होणार रद्द

By admin | Updated: February 27, 2017 02:27 IST

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार शाळेतील विद्यार्थिनींना चटके देण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती

मयूर तांबडे,

पनवेल- पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार शाळेतील विद्यार्थिनींना चटके देण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यातील आरोपी मुख्याध्यापिका सुविधा बेडदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे लवकरच ही शाळा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश शाळेमध्ये एका शिक्षिकेचे १०० रुपये चोरीला गेल्यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका बेडदे यांनी १८ जानेवारी रोजी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी हर्षदा गंगाराम लेंडी (११) हिच्यावर व अन्य सात विद्यार्थिनींवर चोरीचा आरोप करत त्यांच्या शरीरावर लोखंडी उलथन्याच्या साहाय्याने चटके दिले होते. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेची कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्या पालकांनाही देण्यात आली नव्हती. ३० जानेवारी रोजी हर्षदाचे वडील शाळेत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली व जय मल्हार शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर येथील शिकणाऱ्या मुलांच्या शालेय जीवनावर परिणाम होणार होता. या शाळेत ३२ निवासी विद्यार्थी, तर इतर ५५ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, आदिवासी प्रकल्प विभागाने या विद्यार्थ्यांची काळजी घेत त्यांना जवळच्या शाळेत पाठविले आहे. त्यामुळे या मुलांचे वर्ष वाया जाणार नाही. येथील विद्यार्थ्यांना सेंट अ‍ॅण्ड्रुज स्कूल, आकुर्ली, सुषमा पाटील शाळा कामोठे, तसेच कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तसेच जय मल्हार शाळा बंद करण्यात यावी, या संदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी दिली. शाळेतील शिक्षकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पालक वर्गातून होत होती तसेच शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी देखील समस्त पालक वर्गातून उमटत होती. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शासनाकडे अप्पर आयुक्तांकडे प्रस्तावपाठविण्यात आला आहे. त्यामुळे या जय मल्हार शाळेची मान्यता रद्द केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. >जय मल्हार शाळेवर कारवाई केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना इतर नामांकित शाळेमध्ये पाठविण्यात आलेले आहे. त्यांची मान्यता रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. - दिवाकर काळपांडे, सहायक प्रकल्प अधिकारी