शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारला होणार मेडिकल कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 03:23 IST

कुपोषण बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल

जव्हार : कुपोषण बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यानी शनिवारी येथे केली.डॉक्टरांच्या पथकासह महाजन हे जव्हार मोखाड्यात दिवाळीच्या फराळासाठी येणार होते. बालमृत्यू होत असताना दिवाळी कशी साजरी करता? असा सवाल शुक्रवारी विवेक पंडित यांनी केला होता. यावेळी आदिवासींचा फराळ मंत्र्यांना देणार आल्याचे पंडित यांनी जाहीर केले होते. याचा परिणाम म्हणून शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्र म रद्द करून महाजन हे जव्हार शासकीय विश्रामगृहात आले आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी पालघर जिल्ह्यातील आरोग्य, आश्रमशाळा,रोजगार हमी अशा अनेक मूलभूत प्रश्न समस्यांचा पाढा श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडला.सर्व समस्यांबाबत मी सरकार म्हणून स्वत: लक्ष घालणार असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी विवेक पंडित यांनी गिरीश महाजनाकडे जव्हार तेथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी केली आणि त्यांनी ती तत्काळ मान्य करून तसे संबंधितांना निर्देशही दिले. यावेळी जे.जे.रु ग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने त्यांच्यासोबत होते. यावेळी श्रमजीवी संघटनेने आदिवासींचा फराळ गिरीश महाजन यांना दिला, त्यांनीही चवलं, कारांद्यांचा ( चवळी, कंदमुळे) आस्वाद घेतला.पालघरमध्ये एका पाठोपाठ एक बालमृत्यू घडत असताना सरकार दिवाळी साजरी करण्यासाठी आदिवासीपाड्यावर येत असल्याने पंडित यांनी संताप व्यक्त केला. आम्ही सरकारला, मंत्र्यांना आदिवासींचा फराळ खायला देऊ असेही पंडित म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर हा दौरा चर्चेत आला होता. शनिवारी दुपारी गिरीश महाजन यांनी नियोजित पालघर दौरा रद्द करून थेट जव्हार विश्रामगृह गाठले यावेळी पंडित यांच्यासह श्रमाजीवीच्या पदाधिकार्यांनी वास्तव मंत्र्यांसमोर मांडले. येथील उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्याबाबत चार वर्षांपूर्वी निर्णय झाला. परंतु अजून विटही रचली गेली नाही. ते ३०० खाटांचे केल्यास येथे वैद्यकीय महाविद्यालय होऊ शकेल याकडे पंडित यांनी लक्ष वेधले, यावर प्रतिसाद देत जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घोषित केला. महाजन यांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत तब्बल दोन तास चर्चा केली. आणि प्रत्येक मुद्यावर संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले. यावेळी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत , जव्हार तहसीलदार पल्लवी टेमकर उपस्थित होते.(वार्ताहर)>आदिवासी गावी मंत्र्याची दिवाळी अंधारातराज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने यांनी आपला दिवाळीचा पहिला दिवस मोखाडयातील बेरीस्ते या गावी साजरा केला. करोळ या ठिकाणी कुपोषण निर्मूलनाबाबत महाजन आणि डॉ. लहाने यांनी नागरिकांना मार्गदर्शन या नंतर बेरीस्ते येथील वनवासी कल्याण आश्रमात मुक्काम केला. परंतु हा दौरा खाजगी असल्याने याकाळात त्यांनी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली नाही. तसेच कोणत्याही आश्रमशाळा प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना भेटी दिल्या नाहीत. या कार्यक्र मापासून भाजप कार्यकर्ते, स्थानिक प्रशासनाला दूर ठेवले गेले होते. या कार्यक्र मास महाजन नियोजित वेळेपेक्षा खूपच उशिराने आल्याने त्यांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. आपले सरकार कुपोषण निर्मूलनासाठी कायम स्वरूपी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वनवासी कल्याण आश्रमाने केले होते.