शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जावेद खानला फाशीची शिक्षा

By admin | Updated: March 9, 2016 05:54 IST

येथील मानसी देशपांडे या तरुणीवर २००९मध्ये बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद खान उर्फ टिंगऱ्या यास सत्र न्यायालयाने २०१२मध्ये ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई

औरंगाबाद : येथील मानसी देशपांडे या तरुणीवर २००९मध्ये बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद खान उर्फ टिंगऱ्या यास सत्र न्यायालयाने २०१२मध्ये ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फाशीच्या शिक्षेत रूपांतरित केली. न्या. ए. व्ही. निरगुडे आणि न्या. आय.के. जैन यांनी जावेदच्या शिक्षेत वाढ करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती करणारे शासनाचे अपील मंजूर केले, तर जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठीचे जावेदचे अपील फेटाळले. अहिंसानगरमधील अपूर्वा अपार्टमेंटमध्ये अनिकेत आणि मानसी देशपांडे हे भाऊ-बहीण राहत होते. १२ जून २००९च्या मध्यरात्री जावेद खान हबीब खान उर्फ टिंगऱ्या (रा. जालना) हा चोरीच्या इराद्याने देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये घुसला. घरात मानसी एकटीच होती. जावेदने तिचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला स्क्रू-ड्रायव्हरने जखमी केले. त्यानंतर कातरीने तब्बल २१ वार करून तिचा खून केला होता. जावेदने मानसीचा मोबाइल, सोन्याची अंगठी आणि ४५० रुपये चोरून नेले. सकाळी अनिकेत आल्यानंतर हत्येचा उलगडा झाला होता. पोलिसांनी हॉटेलमधील वेटर जावेद खान यास २२ जून २००९मध्येच अटक केली. २४ जानेवारी २०१२ रोजी टिंगऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चोरीचा माल बाळगल्याच्या आरोपाखाली हॉटेलमालक प्रदीप चंडालिया व दुसरा वेटर राम बोडखे यांना दंड ठोठावला होता. त्यानंतर फाशीच्या मागणीसाठी सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. (प्रतिनिधी)