शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला नांदायला न पाठविल्याने जावयाकडून सास-याचा खून

By admin | Updated: October 19, 2016 20:58 IST

पत्नीला नांदायला न पाठविल्याने संतप्त झाल्याने मद्यपी भाऊदास ससाणो (37) या जावयाने बाबूराव घारपडे (70) या सास-याचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 19 - पत्नीला नांदायला न पाठविल्याने संतप्त झाल्याने मद्यपी भाऊदास ससाणो (37) या जावयाने बाबूराव घारपडे (70) या सास-याचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली. याप्रकरणी ससाणोला पोलिसांनी अटक केली आहे.आंबेवाडी मस्जिदच्या बाजूलाच राहणा:या भाऊदासचा संगीता (35) हिच्याशी जानेवारी 2011 मध्ये विवाह झाला. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी तर अडीच वर्षाचा मुलगा आहे. भाऊदासला कामधंदा नसून त्याला दारुचे व्यसनही आहे. याच कारणावरुन पती पत्नीमध्ये नेहमी खटके उडत होते. यादरम्यान, तो पत्नीला शिवीगाळ करुन मारहाणही करायचा. त्याच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून गेल्या चार महिन्यांपासून ती आंबेवाडीतीलच आपल्या माहेरी राहत होती. तरीही दारुच्या नशेत तो तिला त्रास देत होता. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास आंबेवाडीतील  हिम्मतवाला हार्डवेअर या दुकानाबाहेर बसलेल्या बाबूराव यांच्याशी पत्नीला नांदायला पाठविण्यावरुन वाद घातला. तुला दारुचे व्यसन आहे, काम धंदाही नाही, त्यामुळे मुलीला पाठविणार नसल्याचे त्यांनी जावयाला निक्षून सांगितले. यातूनच झालेल्या वादातून त्याने सास-याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना आधी ठाण्याच्या जिल्हा शासकीय त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांनाच त्यांचा 17 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. दरम्यान, सास-यावरील खूनी हल्ल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी जावयाला आधीच अटक केली होती. त्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. बाबूराव यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केल्यानंतर त्याचा 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा ताबा घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सिताराम वाघ हे अधिक तपास करीत आहेत. रागाच्या भरात हे कृत्य केले असून आता आपल्या मुलांचा कोण सांभाळ करणार असा प्रश्न करुन भाऊदासने या गुन्हयाबद्दल पोलिसांजवळ पश्चाताप व्यक्त केला.