शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जावयाचा खुन करणारी सासु साडु आणि दोन मेहुण्यांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 21:24 IST

किरकोळ घरगुती वादामुळे जावयाला जाळून मारणारी सासू, साडू आणि दोन मेहुणे अशा चौघांना सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २५ : किरकोळ घरगुती वादामुळे जावयाला जाळून मारणारी सासू, साडू आणि दोन मेहुणे अशा चौघांना सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मृताच्या पत्नीची निर्दोष मुक्तता झाली. एन-६ सिडको येथील अजय अशोक गवळे यांच्या मृत्युपूर्व जबाबावरून तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार अजय व जयश्री या दोघांचा विवाह झालेला होता. अजय लक्ष्मी कॉलनीतून एन-६ सिडको येथे पत्नीसह राहण्यासाठी आला होता. दरम्यान ३१ मे २०११ रोजी सकाळी अजय व जयश्री या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे जयश्रीने सिडको पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली होती.

त्याच दिवशी सायंकाळी बहिणीला मारहाण केली म्हणून जयश्रीचे भाऊ रवी (२२), कैलास, आई कांताबाई गायकवाड व अजयचा साडू विनोद मगरे (३०, सर्व रा. एन- ६, सिडको) हे घरी आले. या चौघांनी अजयला शिवीगाळ व बेदम मारहाण केली. विनोद मगरे याने अजयच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत अजय घराबाहेर आला असता गल्लीतील नागरिकांनी अजयच्या अंगावर शाल टाकून आग विझविली. त्यानंतर अजयला पत्नी जयश्री, सासू कांताबाई व नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अजय ७३ टक्के भाजल्याचे निष्पन्न झाले.

अजयची प्रकृती अधिक खराब झाल्याने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी अजयचा मृत्युपूर्व जबाब नोंदविला. तसेच अजयने त्याचे वडील अशोक भिकाजी गवळे यांनादेखील वरीलप्रमाणे घटना सांगितली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको ठाण्याचे तत्कालीन फौजदार के. के. शिंदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील एस. व्ही. मुंडवाडकर यांनी ९ साक्षीदार व दोन मृत्युपूर्व जबाब तपासले. न्यायालयाने दोन्ही मृत्युपूर्व जबाब व साक्षी ग्राह्य धरून रवी, कैलास, कांताबाई गायकवाड व विनोद मगरे यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी अडीच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. पुराव्याअभावी जयश्रीची निर्दोष मुक्तता केली.