शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘जलपरी’ने धाडले चार कोटींचे बिल! लातूरला मोफत पाणी देण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

By admin | Updated: May 13, 2016 08:17 IST

मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे

लातूर : मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. या पत्रामुळे लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा हवेतच विरली. लातूरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून दररोज मिरजेहून ५० रेल्वे वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. १२ मे पर्यंत ६ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी रेल्वेला दररोज १२.५० लाख रुपये खर्च येत आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या खर्चाचा उल्लेख आहे. लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची घोषणा रेल्वेमंत्री प्रभुंनी केली होती. या घोषणेचे स्वागत करत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी जलपरीवर बॅनर लावून रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. >जिल्हाधिकारी म्हणतात२ कोटी ४ लक्ष रुपयांचे बिल रेल्वे विभागाकडून बुधवारी आले असून राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे या बिलाच्या देयकासंदर्भात मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लोकमतला सांगितले.