शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जालना-शिर्डी डेमू रेल्वेला हिरवी झेंडी

By admin | Updated: June 4, 2017 13:14 IST

नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला असून, शनिवारी या रेल्वेगाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी

औरंगाबाद, दि. 4 - जालना - नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला असून, शनिवारी (दि.३) या रेल्वेगाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी येथून रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून उद््घाटन केले. तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील वायफाय सुविधा, व्हीआयपी कक्ष, प्लॅटफॉर्म क्रमांक- २ व ३ वरील शेड आणि मुकुंदवाडी स्टेशनवरील आरक्षण प्रणालीचेही लोकार्पण करण्यात आले.लोकार्पण सोहळ्यानिमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे आ. संजय शिरसाट, महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, दक्षि ण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांची उपस्थिती होती. या सोहळ्यात बोलताना आ. शिरसाट म्हणाले, रेल्वेचे अधिकारी येतात तेव्हाच रेल्वेस्टेशनवर स्वच्छता दिसते. आजही हीच परिस्थिती दिसते. परंतु सोहळ्यानिमित्त दिसणारी स्वच्छता कायम दिसली पाहिजे, असे ते म्हणाले. महापौर घडामोडे म्हणाले, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे नागरिकांच्या सुविधेसाठी उड्डाणपूल आवश्यक आहे.ए. के. सिन्हा म्हणाले, औरंगाबाद रेल्वेस्टेशन राज्यातील पहिले कॅशलेस रेल्वेस्टेशन ठरले असून, याठिकाणी आता वायफाय सुविधाही देण्यात येत आहे. अगदी सहजपणे त्याचा वापर करता येतो. ३७ लाख रुपयांच्या निधीतून रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक- २ व ३ वर शेड उभारण्यात आले आहे. मुकुंदवाडी स्टेशनवर आरक्षण प्रणाली सुरू झाली आहे. या सुविधेसह प्रवाशांनी आॅनलाईन पद्धतीनेही तिकीट आरक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.याप्रसंगी स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, वाहतूक निरीक्षक लक्ष्मीकांत जाकडे, धनंजयकुमार सिंह, आशुतोष गुप्ता, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे आदी उपस्थित होते.डेमूसाठी तीन प्रस्तावजालना-नगरसोल डेमू रेल्वेचा मनमाडपर्यंत विस्तार करण्याची मागणी होती. त्याचबरोबर नाशिक, इगतपुरी आणि शिर्डी असेही प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये ही रेल्वे शिर्डीपर्यंत नेण्यास मान्यता देण्यात आली. ही रेल्वे मनमाडलाही जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा झाल्याचे डॉ. ए. के. सिन्हा म्हणाले.