शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शेतकऱ्यांचे जललेखा आॅडिट

By admin | Updated: June 27, 2016 02:02 IST

पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे शेतकऱ्यांनी नुकतेच आॅडिट केले आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे शेतकऱ्यांनी नुकतेच आॅडिट केले आहे. त्यामुळे आंबा खोरे लाभ क्षेत्राचे खरे वास्तव समोर आले आहे. रिलायन्सच्या औष्णिक प्रकल्पाला कागदावर मंजूर केलेले २०० दलघली (दशलक्ष घनलीटर) पाणी तो प्रकल्प रद्द झाल्याने शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे. आंबा खोऱ्याची नेमकी स्थिती काय आहे. याचा अहवाल येत्या एक महिन्यात सादर करण्याचे लघु पाटबंधारे विभागाने मान्य केल्याने गेल्या ४५ वर्षांपासूनची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या रेट्यामुळे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये २४ एप्रिल १९६९ रोजी आंबा खोरे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. सरकराने दोन कोटी ८५ लाख रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले होते. त्यानंतर उजवा आणि डावा तीर कालव्यास २ जुलै १९७६ रोजी मान्यता दिली होती. या प्रकल्पामुळे अलिबाग आणि पेण तालुक्यातील २८ गावांतील चार हजार ६६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र सुजलाम सुफलाम होणार होेते. मात्र गेली ४५ वर्षे उलटूनही हक्काचे पाणी शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाही. आंबा खोऱ्यामध्ये २७३ दलघमी (दशलक्ष घनमीटर)पाणीसाठा आहे. त्यातील २७२ दलघमी पाणी बिगर सिंचनासाठी वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी फक्त १८९ दलघमी पाण्याचा वापर होत आहे. त्यातील ८३ दलघमी पाणी शिल्लक आहे. रिलायन्सच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी २०० दलघली दररोज पाण्याचे वाटप कागदावर केले आहे. त्याचप्रमाणे पटनी पॉवर ४० दलघली, टाटा पॉवरसाठी ३० दलघली पाण्याचे वाटप केलेले आहे. या पाण्याचा वापर गेली ४५ वर्षे केला गेला नसल्याने कोट्यवधी लीटर पाणी रोजचे समुद्राला जाऊन मिळत आहे. हे सर्व चित्र असताना लघू पाटबंधारे विभागाकडे पाणी शिल्लक नसल्याची ओरड सातत्याने केली जात आहे.आंबा खोऱ्याचे पाणी शेतीला मिळावे, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने २००७ पासून पाठपुरावा केला. पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे आॅडिट नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रिलायन्स कंपनीचा प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांना कागदावर मंजूर केलेले २०० दलघली पाणी शेतीला मिळणे शक्य आहे.