शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटलांकडे, सहपालकमंत्रिपदाची निर्मिती

By admin | Updated: December 29, 2016 22:01 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. त्याशिवाय पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कायम राहील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच सहपालक मंत्रिपद निर्माण केले आहे. ज्या दोन मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचेही समाधान अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी केले आहे.एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना ते जळगाव आणि बुलढाणाचे पालकमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या दोन्हींचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुंडकर यांच्याकडे दिले. फुंडकर हे खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर फुंडकर यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रीपद काढण्यात आले आहे. जळगावच्या राजकारणात खडसे विरुद्ध जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोघांच्या संघर्षाचा फटका पक्षाला बसू नये आणि संघर्षाच्या प्रसंगात मध्यस्थी व्हावी यासाठी मुद्दाम चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपद दिल्याचे म्हटले जात आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते हे आतापर्यंत परभणीचे पालकमंत्री होते. आता त्यांना उस्मानाबादचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे उस्मानाबादचे सहपालक मंत्री असतील.गेल्या विस्तारात राज्यमंत्री झालेले भाजपाचे मदन येरावार यांना यवतमाळचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून तेथे आतापर्यत पालकमंत्री असलेले महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांना सहपालक मंत्रीपद देण्यात आले आहे. राठोड हे आता वाशिमचे पालकमंत्री असतील. तेथे येरावार हे सहपालक मंत्री असतील. आतापर्यंत वाशिमचे पालकमंत्रीपद हे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे होते. आता त्यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे. साता-यामध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे पालकमंत्री आहेत. तेथे राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री असतील. राज्यमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे परभणीचे नवे पालकमंत्री असतील. आतापर्यंत हे पद दिवाकर रावते यांच्याकडे होते.