शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सोने आणि पाईपपाठोपाठ चटई उद्योगात जळगावचा दबदबा

By admin | Updated: October 6, 2016 16:17 IST

प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकावू चटई बनविण्याची सुरुवात जळगावात ३० वर्षांपूर्वी झाली.

राम जाधव, ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ६  - प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकावू चटई बनविण्याची सुरुवात जळगावात ३० वर्षांपूर्वी झाली. पर्यावरणपूरक असलेल्या या उद्योगाला जळगावची भूमी मानवली आणि तब्बल १२५ उद्योग येथे सुरू झाले. देशातील एकूण चटई उद्योगांपैकी ८० टक्के उद्योग जळगावात असून त्यातील बराच माल हा परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे सोने, पीव्हीसी पाइपपाठोपाठ चटई क्षेत्रातही जळगावचा दबदबा निर्माण झाला आहे. आशियातील सगळ्यात मोठा चटई व्यवसाय जळगावात आहे़ मात्र आता कोलकाता, बंगळुरू व चेन्नई या शहरातही हा उद्योग सुरू झाल्याने येथील खरेदीदार येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी बहुतेक फेरीवाले खरिपाच्या हंगामातून मिळालेला पैसा चटई खरेदी करण्यासाठी गुंतवत असतात.

पावसाने आशा पल्लवीत या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे काही महिन्यांपासून पडून असलेल्या तयार मालाला दिवाळीपर्यंत चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

यंत्रमागप्रमाणे हव्यात सवलती ४१०० टक्के निरुपयोगी व फेकलेल्या प्लॅस्टिकपासून ही चटई तयार केली जाते़ पर्यावरणपूरक असलेल्या या उद्योगासाठी इतर राज्यांमध्ये ५ ते ६ रुपये युनिटचे वीजदर आहेत तर त्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर ८ ते ९ रुपये आहेत़ यंत्रमाग उद्योगाप्रमाणे या उद्योगालाही सवलतीच्या कक्षेत आणावे, अशी अपेक्षा आहे.

१५ हजार जणांना रोजगार जळगावात १२५ पेक्षा जास्त चटई उद्योग आहेत़ यावर प्रत्यक्ष अवलंबून असलेले १५ ते १६ हजार कामगार; या उद्योगाला कच्च्या मालासह इतर वर्कशॉप व वाहतूक व्यवस्था पुरवणारे अशा हजारोंना या क्षेत्रात रोजगार मिळतो़ सध्या या व्यवसायात सातत्य नसल्याने रोजगार सोडणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे़ तसेच सतत ३० ते ४० टक्क्यांनी कुशल आणि अर्धकुशल कामगारांची उणीव जाणवते़हा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. प्रत्यक्ष शेती क्षेत्रातील फेरीवाल्यांवर अवलंबून असलेल्या या व्यवसायात अनेक अकुशल कामगारांनाही रोजगार मिळतो आहे़ शासनाकडून या पर्यावरणपूरक व्यवसायावर विविध कर आकारून अन्याय होत आहे़- दिनेश राठी, अध्यक्ष, मॅट असोसिएशन, जळगाव़