शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प पुढील वर्षाअखेर सुरू होणार

By admin | Updated: April 19, 2017 03:08 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम डिसेंबर २०१८ अखेर सुरू होईल, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीदरम्यान सांगितले.

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम डिसेंबर २०१८ अखेर सुरू होईल, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीदरम्यान सांगितले. या प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात काही शंका आहेत आणि त्या दूर करण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाला केले. फुकुशिमासारखी दुर्घटना होऊ नये म्हणून या प्रकल्पाची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेली आहे, असे शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकासविषयक मंत्रालयाचे सरचिटणीस ख्रिश्चियन मॅस्सेट, फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झायग्लेर आणि या प्रकल्पाची उभारणी करणार असलेल्या ईडीएफ कंपनीचे अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता. प्रकल्पाची उभारणी करताना सुरक्षिततेसंदर्भात सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली आहे. ब्रिटनने दोन प्रकल्पांसाठी आमच्यासोबत करार केला आहे, असे शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प आधीच्या नियोजनानुसार २०१८ मध्ये पूर्ण होणार होता. तथापि, स्थानिकांनी केलेला विरोध, आधी या प्रकल्पाची उभारणी करणार असलेल्या कंपनीने घेतलेली माघार आदी कारणांमुळे विलंब झाला. (विशेष प्रतिनिधी)