शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जयस्वाल-शर्मा यांची पालिकेत ‘चाय पे चर्चा’, दाऊदशी लागेबांधे असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:05 IST

खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यामुळे संशयाच्या भोव-यात असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली.

ठाणे : खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यामुळे संशयाच्या भोव-यात असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी कासकर आणि त्याच्या साथीदारांना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री मुंबईतील नागपाड्यातून अटक केली. या प्रकरणात नगरसेवक आणि काही मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. शर्मा यांनी तातडीने जयस्वाल यांची भेट घेतल्याने या प्रकरणात गुंतलेल्या नगरसेवकांवर लागलीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी गाजलेल्या सुरज परमार आत्महत्या प्रकरणाची माहिती घेण्याकरिता शर्मा हे जयस्वाल यांना भेटले असण्याची शक्यता आहे. भेटीतील चर्चेचा तपशील दोघांनीही उघड केला नाही.शर्मा यांची ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर ते सहज चहापान करण्यासाठी आले होते, असे जयस्वाल यांनी सांगितले. आमची भेट पूर्वनियोजित होती, असेही ते म्हणाले. शर्मा यांनीही ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगितले.>आयबीकडून चौकशीकासकरची बुधवारी इंटलिजन्स ब्युरोच्या दोन अधिका-यांनी चौकशी केली. मोस्ट वॉण्टेड डॉन दाऊद इब्राहिम याचा कासकर हा भाऊ असून खंडणीवसुलीच्या या प्रकरणात तो दाऊदच्या संपर्कात होता किंवा कसे, याबाबत आयबीच्या अधिकाºयांनी कासकरकडे चौकशी केली. ठाण्यातील वरिष्ठ अधिका-यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला नाही.>सराफा व्यावसायिकाकडूनही खंडणीजागेच्या व्यवहारात ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडूनही कासकर याने खंडणी उकळल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. खंडणीपोटी या व्यावसायिकाकडून आरोपींनी १५ लाखांचे सोने वसूल केल्याचे समजते. या सराफा व्यावसायिकाने त्याची जमीन विक्रीला काढली होती. मुमताज इजाज शेख या प्रॉपर्टी एजंटने या जमिनीचा सौदा केला.दरम्यान, शेख याचे कासकरशी असलेले संबंध या व्यावसायिकास समजल्याने त्याने जमिनीचा सौदा रद्द केला. त्यामुळे शेख आणि त्याचा साथीदार इसरार अली जमील सय्यद यांनी त्या व्यावसायिकाच्या दुकानावर जाऊन धमक्या दिल्या. या ससेमिºयातूनसुटका करून घेण्याकरिता कासकरच्या हस्तकांनी केलेल्या मागणीनुसार त्याने १५ लाखांचे दागिने खंडणी म्हणून दिले. रात्रीउशिरा याप्रकरणीही कासकरवर गुन्हा दाखल केला गेला.