शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जैन तत्त्वज्ञान केंद्र जगात सर्वोत्कृष्ट ठरेल

By admin | Updated: July 20, 2015 01:08 IST

उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे.

कचनेर (जि. औरंगाबाद) : उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे. मात्र केंद्रातील पायाभूत सुविधा व गं्रथसंपदेमुळे ते जगातील सर्वोत्कृष्ट केंद्र होईल, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे व्यक्त केला. श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर ट्रस्टअंतर्गत विद्यापीठ मान्यताप्राप्त जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राचे चोपडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चोपडे म्हणाले की, इतिहासात मानव जातीच्या विकासासाठी भगवान महावीर व भगवान बुद्धांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. या केंद्राद्वारे मानवाच्या विकासाबाबत उत्कृष्ट संशोधन व्हावे.जैन तत्त्वज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले जाते. केंद्राच्या माध्यमातून येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन जैन तत्त्वज्ञानाचा जगभर प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे विभागाचे विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले म्हणाले की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जैन तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे.