शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’विरोधात आता २० जुलैला जेलभरो!

By admin | Updated: July 17, 2017 01:20 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत असल्याची टीका करत जमिनी घेण्यासाठी दडपशाही

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत असल्याची टीका करत जमिनी घेण्यासाठी दडपशाही सुरू असल्याचा आरोप शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रविवारी केला. ज्यांनी जमिनी दिल्या, ते जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल असून शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी असल्याचे सांगत खरेदीच्या नावावर ही दिशाभूल असल्याची टीकाही शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केली आणि दडपशाही अशीच सुरू राहिली, तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागून हा महामार्ग रोखू, असा इशाराही त्यांनी दिला.जमिनी खरेदीला सुरूवात झाल्याचे आणि त्यासाठी ठाण्यात कार्यक्रम झाल्याचे समजताच संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील आवणीची कामे सोडून महामार्गाविरोधात तातडीची बैठक घेतली आणि २० जुलैला जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. या जेलभरो आंदोलनाला शहापुरातून सुरूवात करण्यात येईल, असे जाहीर करतानाच या आंदोलनाच्या नेत्यांनी भूमिका बदलणारे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि रस्ते विकास महामंडळाविरोधात निषेधाचा ठरावही मंजूर केला. या बैठकीस शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, नेते बबन हरणे, गणेश अधिकारी, रामुशेठ अंदाडे, हरिभाऊ खाडे, आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत समृद्धी महामार्गाला असलेल्या ठाम विरोधाचा पुनरूच्चार करण्यात आला. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आणि पॅकेजऐवजी वाटाघाटी पद्धतीने सुरू असलेल्या जमीन खरेदीच्या सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात संघर्ष समितीचे नेते बबन हरणे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत नाही. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना विश्वासात घेत नाही, रेडिरेकनरचे दर काय आहेत, नेमका कसा आणि किती मोबदला देणार , पॅकेज काय याची माहिती न देता दडपशाही सुरू आहे. उलट नेत्यांबद्दल, आंदोलक शेतकऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांनी समृद्धी महामार्गाला असलेला विरोध कायम असल्याचा पुनरूच्चार केला. आम्ही सनदशीर मार्गाने विरोध करीत असतानाही सरकारने पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून आम्हाला अटक केली. परंतु आम्ही डगमगणार नाही. आता आम्ही या महामार्गाविरोधात, सरकारच्या दडपशाहीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पवार म्हणाले. आमदार पांडुरंग बरोरा यांनी या महमार्गाविरोधातील आंदोलनात शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगितले.